Urvashi Rautela ला ऋषभ पंतसोबत करायचंय पॅचअप? ‘तो’ Video होतोय व्हायरल


Urvashi Rautela on Rishabh Pantn Viral video : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. आशिया कपमध्ये उर्वशीने नसीम शहाची स्टोरी तिच्या इन्स्टाग्रामवर ठेवली होती. यावरून तिच्यावर टीका झाली. याआधी भारतीय खेळाडू ऋषभ पंत आणि तिच्याबद्दलच्या चर्चांणा उधाण आलं होतं. अशातच आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये उर्वशी पंतची माफी मागत असल्याचं दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतला छोटू भैया असं संबोधलं होतं. उर्वशीने ऋषभ पंतबद्दल एका पोस्टमध्ये लिहिलं होतं- छोटू भैय्याने बॅट बॉल खेळावं. मी काही मुन्नी नाही डार्लिंगसाठी बदनाम होण्यासाठी. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. उर्वशीची ही पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र आता अभिनेत्रीने हात जोडून ऋषभ पंतची माफी मागितली आहे. 

 

उर्वशीला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की तिला ऋषभला काही मेसेज द्यायचा आहे का?, यावर प्रतिक्रिया देताना उर्वशी म्हणाली, सिद्धी बात नो बकवास… म्हणूनच मी काही बकवास करत नाहीये. यानंतर उर्वशीला पुन्हा विचारण्यात आल की तुला ऋषभ पंतला काही सांगायचं आहे का?, यावर उर्वशी म्हणाली, मला काही बोलायचं नाही पण त्यानंतर तिनं हात जोडले आणि ऋषभ पंतची माफी मागितली, उर्वशी म्हणाली सॉरी…मला माफ कर.

दरम्यान, उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. काही युजर्सनी उर्वशीला ऋषभसोबत पॅचअप करायचं असल्याचं म्हटलं आहे. आता ऋषभ काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Source link

Leave a Reply