उर्फी जावेदवर आली चेहरा लपवण्याची वेळ, कपड्यांमुळे नाही तर ‘या’ कारणामुळे….


मुंबई : उर्फी जावेद  (Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्स आणि बिंधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. अशाप्रकारे उर्फी जावेद बोल्ड (Urfi Javed Bold) अभिनेत्री आहे पण तिची लोकप्रियता बोल्ड कपडे आणि अतरंगी फॅशनमुळे. जेव्हा -जेव्हा उर्फी अतरंगी कपड्यांमध्ये दिसते तेव्हा-तेव्हा ती चर्चेत येतेच येते. दरवेळी आपल्या फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. 

नुकताच उर्फीने तिचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती मेकअपशिवाय दिसत आहे. शेअर केलेल्या या फोटोत अभिनेत्रीचा चेहरा खूप सुजलेला दिसत आहे. उर्फीने हा फोटो ट्विटरवर शेअर करत ऍलर्जीशी लढतानाचं दुख: सांगितलं आहे. फोटो शेअर करताना उर्फीने एक मजेदार कॅप्शन दिलं आणि लिहिलं आहे की, क्या से क्या हो गया! जेव्हा तुम्हाला ऍलर्जी असते, तुम्हाला मला बघून कोणाची आठवण आली? खरं खरं सांगा.

उर्फीला आहे ही त्वचेची समस्या 
उर्फी जावेदने आपल्या त्वचेची समस्या उघड करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एका मुलाखतीत उर्फीने सांगितलं की, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या ऍलर्जी आहे, जेव्हा ती कपडे घालते तेव्हा तिला पुरळ किंवा फोड येतात. उर्फीच्या त्वचेची समस्या असूनही ती फॅशन आणि स्टाइलवर प्रयोग करणं थांबवत नाही.

उर्फी जावेदच्या या फोटोवर यूजर्सही जोरदार प्रतिक्रिया करत आहेत.  सोशल मीडियावर तिच्या फॅशनमुळे चर्चेत असलेल्या उर्फीचा हा लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोकं अभिनेत्रीच्या या लूकची खिल्ली उडवत आहेत तर काही तिला कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत.

युजर्सने दुसरी राखी सावंत असल्याचं सांगितलं
ट्विटरवर युजर्स उर्फी जावेदला ट्रोल करताना दिसत आहेत. एका यूजरने तर अभिनेत्रीची तुलना राखी सावंतशी केली आहे. फोटोमध्ये उर्फी जावेदने तिचा सुजलेला चेहरा दाखवत मी कोणा सारखी दिसते असं विचारलं. तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था पाहून उर्फी खूपच अस्वस्थ दिसत आहे. बहुतेक युजर्सनी उर्फीला आलेली ऍलर्जी पूर्ण कपडे परिधान करण्याशी जोडली आहे. एका युजर्सनं लिहिलं, “असे पूर्ण कपडे घातले तर ऍलर्जी होईल..” अशा अनेक प्रकारच्या कमेंट करुन युजर्स उर्फीची खिल्ली उडवत आहेत.Source link

Leave a Reply