UPI Lite: पिन न टाकता मिनिटांत करा पेमेंट, इंटरनेटचीही नाही गरज


नवी दिल्ली: UPI Payments: UPI चा वापर आज अनेक कामांमध्ये केला जातो. पण, ही सेवा वापरण्यासाठी, तुम्हाला तुमचा पिन टाकावा लागतो आणि पेमेंट त्यानंतरच पूर्ण होते. पण, आता ही सर्व्हिस अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने UPI Lite सेवा सुरू केली आहे. ही एक ऑन-डिव्हाइस वॉलेट सुविधा आहे, जी युजर्सना UPI पिन न वापरता २०० रुपयांपर्यंत पेमेंट करू देते. चला तर मग जाणून घेऊया UPI Lite चे फीचर्स आणि फायदे. सोप्या भाषेत सांगायचे तर, UPI Lite हे ऑन-डिव्हाइस वॉलेट आहे. ते वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून अॅपच्या वॉलेटमध्ये पैसे टाकावे लागतील. हे ऑन-डिव्हाइस वॉलेट असल्याने, युजर्सना रिअल-टाइम पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. तसेच, यासाठी पिन टाकण्याची गरज नाही.

वाचा: Realme च्या स्वस्त स्मार्टफोनचा पहिला सेल, डिस्काउंटसह फ्री मिळणार इयरफोन्स

या सेवेच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने व्यवहार करता येतात. डेबिट पेमेंट ऑफलाइन असेल, तर खात्यात पैसे जोडण्यासाठी इंटरनेट आवश्यक असेल. लवकरच NPCI डेबिट आणि क्रेडिट दोन्ही ऑफलाइन करण्याची सुविधा प्रदान करेल.

UPI Lite ची मर्यादा काय आहे:

ही सेवा कमी मूल्याच्या व्यवहारांसाठी तयार करण्यात आली असून त्याची मर्यादा २०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या स्तरापर्यंत पेमेंट करण्यासाठी तुम्हाला UPI पिनची आवश्यकता नाही. तुम्ही ऑन-डिव्हाइस वॉलेटमध्ये २,००० रुपयांपर्यंत शिल्लक ठेवू शकता. याचा वापर करून, युजर्स एका दिवसात अमर्यादित वेळा पैसे देऊ शकतात.

वाचा: याहून चांगले काय ! Reliance Jio च्या प्लानमध्ये १०० रुपयांत ३ GB डेटासह OTT बेनेफिट्स, पाहा डिटेल्स

UPI Lite कोण वापरू शकते:

भीम अॅपवर UPI लाइट फीचर सक्षम करण्यात आले आहे. आतापर्यंत या यादीमध्ये कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, एनपीसीआय यांचा समावेश आहे.

UPI Lite:बॅलेन्स कसा जोडायचा

UPI Lite वॉलेटवर फक्त ऑनलाइन मोडद्वारे (इंटरनेटसह) बॅलेन्स जोडता येईल . यामध्ये, तुम्ही एक्स्ट्रा फॅक्टर ऑथेंटिकेशन (AFA) किंवा UPI ऑटोपे वापरून बॅलेन्स जोडण्यास सक्षम असाल. याची नोंदणी युजर्सनी ऑनलाइन पद्धतीने केली आहे. तुम्ही कधीही UPI Lite डिसेबल केल्यास उर्वरित रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. जलद आणि सुलभ पेमेंट सुलभ करण्यासाठी युजर्सना UPI लाइट उपलब्ध करून देण्यात आले आहे.

वाचा: सरकारने दिला इशारा, हॅकिंगपासून सुरक्षित राहायचे असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करुच नका

Source link

Leave a Reply