Headlines

उपजीविका साधनांमुळे महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहतील- पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

सोलापूर / प्रतिनिधी – एकमेकीला साथ सहकार्य देत जर महिलांनी आगेकूच केली तर कोणतेही संकट तिला हरवू शकणार नाही. कष्ट जिद्द महत्वकांक्षा ही महिलांची शक्तिस्थळे आहेत. या कोरोना काळात कित्येक कुटुंबांची परवड झाली. कित्येक कुटुंबातील कर्ता पुरुष गेला त्यांचं दुःख तर आभाळाएवढा आहे. अशा परिस्थितीत आधार मागासवर्गीय महिला संस्थेने दिलेला आधार समाजाला आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले.

उपजीविका निर्मिती आणि कुशल युवा प्रशिक्षण प्रकल्पांतर्गत कोरोना महामार्गामुळे रोजगार गमावलेल्या घटकातील लाभार्थी महिलांना, स्वावलंबी बनवुन उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देत एच.एस.डी.आय. आणि सेवा सहयोग पुणे यांच्या सहकार्यातून आधार महिला संस्थेच्या वतीने गरजू महिला लाभार्थ्यांना उपजीविका साधन वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे महापालिका उपायुक्त धनराज पांडे पुण्यनगरीचे उपसंपादक भरत मार मोरे, अभिनेत्री रोहिणी माने,नि निर्मोही अग्निहोत्री, संस्थेचे अध्यक्ष शुभांगी कलकरी आदी उपस्थित होते‌.

प्रारंभी जगदीश कलकेरी यांनी आपल्या प्रास्ताविकेत 2006 पासून आधार मतिमंद निवासी विद्यालयाच्या वतीने शासनाच्या मदतीविना समाजातल्या या दुर्लक्षित घटका चे काम चालू आहे. प्रसंगी पत्नीच्या गळ्यातील दागिने मोडले परंतु हा घेतलेला वसा कायम आहे. यंदा पुढे जाऊन 71 महिलांना शिलाई चे प्रशिक्षण देऊन 71 महिलांना शिलाई मशीन आणि 5 आटा चक्की देण्यात आले त्यांना आज उपजीविका साधन चे वाटप करण्यात येत आहे यानिमित्ताने महिला आता स्वतःच्या फार उभे राहतील यात आनंद आहे असे सांगितले. तर सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी संकटे येत असतात जात असतात त्यामुळे त्यावर मात करून महिलांनी कधीच न थांबता मार्गक्रमण करावे असे आवाहन केले. तर पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी कोरोना काळात विडी घरकुल या भागातील कामगारांचे दुःख जवळून पहावयास मिळाले काळीज पिळवटून टाकणाऱ्यामन हेलावणारा घटना जवळून पाहिल्या. अशा घटकांना जगण्याचं मोठं बळ मिळावं त्याकरता आधार उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे सांगितले. याप्रसंगी जगदीश पाटील राहुल बिराजदार यांनीही मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमास शुभदा कलकेरी ,कोमोलिका कलकेरी, शुभम कलकेरी,रोहीणी माने, विवेकानंद कंदकुरे, निर्मोही अग्निहोत्री संजय जोगीपेटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका अग्निहोत्री यांनी केले यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार जगदीश कलकरी यांनी मानले .

मॅडम काय बी करा ..तेवढी दारूबंदी करा.

एक लाभार्थी महिला आपले मनोगत व्यक्त करत असताना दारुमुळे आपले संसार कसा उद्ध्वस्त झाला.हे सांगताना त्या महिलेला अश्रू अनावर झाले. आणि ती रडू लागली. तिने पोलीस अधीक्षक यांना उद्देशून मॅडम काय बी करा पण गावातील दारूबंदी करा अशी तिने भरल्या डोळ्यांनी विनवणी केली.

Leave a Reply