Headlines

उन्हाळी सुट्टीत गावाला जायचंय?, असं बुक करा रेल्वेचं कन्फर्म तिकिट, एजंटला पैसे द्यायची गरजच नाही


नवी दिल्लीः इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC) ई-वॉलेट द्वारे ग्राहकांना आधीच पैसे जमा करण्याची संधी देते. ही एक सिस्टम आहे. ज्याद्वारे प्रवासी आयआरसीटीसीकडे अडवॉन्स्ड पैसे जमा करू शकतात आणि तिकिटाचे पैसे पे करू शकतात. ऑनलाइन तिकिट बुक करण्यासाठी आयआरसीटी ई-वॉलेट प्रवाशांना ही सुविधा देते.

आयआरसीटीसी ई-वॉलेट
ई-वॉलेट एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कार्ड आहे. याचा वापर कंज्यूमर किंवा स्मार्टफोनच्या मदतीने ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी केला जातो. हे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सारखे काम करते. परंतु, पे करण्यासाठी ई-वॉलेटला ग्राहकांची बँक अकाउंट लिंक असायला हवी. आयआरसीटीसी ई-वॉलेट चिंतामूक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा देते. या मोडद्वारे पे बँकेच्या पेमेंट अप्रूव्हल मिळवण्यासाठी आवश्यक रिझर्व्हेशन वेळ वाचवण्यात मदत करते. कारण, तिकिट सहज आयआरसीटीसी ई-वॉलेट अकाउंटवरून बुक केले जावू शकते. जर लिस्टमध्ये सुद्धा कोणतेही बँक ऑफलाइन असेल तर हे काम करते. या ठिकाणी पेमेंट गेटवेवरून तिकिट फी वाचवते.

या सर्वेत भाग घ्या आणि मिळवा आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी

आयआरसीटीसी वॉलेटचे खास वैशिष्ट्ये
यूजर्स सर्टिफिकेशनसाठी आयआरसीटीसी ई-वॉलेट यूजर्सला इंटरनेट व्हेरिफिकेशन प्रोसेस अंतर्गत पॅन किंवा आधार कार्ड द्वारे व्हेरिफाय आणि ऑथेटिंग केले जावू शकते. ही एक सिक्योर्ड अॅक्सेस देते. कारण, यूजर्सला सर्व आयआरसीटीसी ई-वॉलेट बुकिंग साठी आवश्यक ट्रान्झॅक्शन पासवर्ड-पिन नंबर मिळते. आयआरसीटीसी ई-वॉलेट लिंक एक फुल आयआरसीटीसी ई-वॉलेट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सुद्धा देते. तिकिट रद्द केल्यानंतर रिफंड तुमच्या आयआरसीटीसी ई-वॉलेट अकाउंटमध्ये जमा होते.

IRCTC ई-वॉलेट द्वारे तिकिट कसे रजिस्टर आणि बुक कराल
१. सर्वात आधी आपल्या सध्याच्या आयआरसीटीसी यूजर आयडी आणि पासवर्ड सोबत आयआरसीटीसी मध्ये लॉगिन करा.
२. तुम्हाला प्लान माय ट्रॅव्हल पेजवर आयआरसीटीसी ई-वॉलेट सेक्शन मिळू शकते.
३. पुन्हा आयआरसीटीसी ई-वॉलेट रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
४. व्हेरिफिकेशनसाठी पॅन किंवा आधार अन्य डिटेल्स टाका.
५. कोणत्याही सध्या पेमेंट ऑप्शन सोबत ५० (सर्विस टॅक्स वगळता) रुपयाचे डिपॉझिट रजिस्ट्रेशन चार्ज ऑनलाइन जमा करावे लागेल.
६. आयआरसीटीसी ई-वॉलेट मध्ये कमीत कमी १०० रुपये जमा करावे लागतील. तिकिट बुकिंग अमाउंटचे रक्कम पे करण्यासाठी आयआरसीटीसी ई-वॉलेटला अन्य बँकेसोबत पेमेंटच्या ऑप्शन म्हणून दाखवले आहे. आयआरसीटीसी ई-वॉलेट अकाउंट मध्ये जमा अमाउंटच्या स्थितीसाठी उजव्या नेव्हिगेशनवर डिपॉझिट हिस्ट्री लिंकवर क्लिक करा.
७. पुन्हा तुम्हाला पासवर्ड प्रोफाइल टाकावी लागेल आणि नंतर गो वर क्लिक करावे लागेल.

ई-वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यासाठी स्टेप जाणून घ्या
आयआरसीटीसी ई-वॉलेट सोबत रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही व्हर्च्युअल वॉलेट मध्ये पैसे जमा करू शकता.
१. आपल्या आयआरसीटीसी ई-वॉलेट अकाउंटमध्ये लॉगइन करा.
२. ई-वॉलेट खात्यांतर्गत आयआरसीटीसी ई-वॉलेट जमावर क्लिक करा.
३. जी रक्कम हवी ती त्या ठिकाणी टाका.
४. पेमेंटची पद्धत निवडा.
५. फंड तुमच्या आयआरसीटीसी ई-वॉलेट मध्ये क्रेडिट केले जाईल.
नोंदणी शूल्क ५० रुपये प्लस सर्विट टॅक्स
ट्रान्झॅक्शन चार्ज १० रुपये प्लस ट्रान्झॅक्शन सर्विस फी
आयआरसीटीसी ई-वॉलेट यूजर्स अकाउंट मध्ये जास्तीत जास्त १० हजार रुपये जमा करू शकतात.

वाचा: OnePlus च्या मोठ्या स्क्रीनसह येणाऱ्या टीव्हीला स्वस्तात खरेदीची संधी, फीचर्स एकापेक्षा एक जबरदस्त; पाहा डिटेल्स

वाचा: अलर्ट: SBI ने लाखो ग्राहकांना केले सावध, ‘या’ नंबर्सवरून कॉल आल्यास करू नका रिसिव्ह

वाचा: जबरदस्त! ‘या’ रिचार्जवर चक्क मोफत मिळतो फोन, कोणतेही अतिरिक्त पैसे नाही; एक वर्ष डेटा-कॉलिंग फ्री

Source link

Leave a Reply