Headlines

Umran Malik | ‘जम्मू एक्सप्रेस’ सुस्साट, IPL गाजवल्यानंतर आता टीम इंडियात संधी

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सर्वात वेगवान बॉल टाकणाऱ्या ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकची (Jammu Express) टीम इंडियात (Team India) निवड झाली आहे.  (umran malik who bowled fastest delivery in ipl 2022 has selected in team india team against south africa T20 series) 

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी (India vs South Africa T 20 Series) भारतीय संघ जाहीर केला. या सीरिजमध्ये उमरानला संधी देण्यात आली. 

आपल्या मुलाची टीम इंडियात निवड झाल्याने कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. एका फळ विक्रेत्याचा मुलगा ते टीम इंडियाचा असा यशस्वी प्रवास पूर्ण करणाऱ्या उमरानवर कौतुकाचा वर्षाव होतोय. उमरानच्या वडिलांनी संपूर्ण देशवासियांचे आभार मानले आहेत.

उमरानचे वडिलांच्या प्रतिक्रिया

“उमरानला इतके प्रेम दिल्याबद्दल मी देशाचा आभारी आहे. उमरानच्या मेहनतीचं हे ‘फळ’ आहे. देशाला अभिमान वाटेल अशीच कामगिरी तो करेल”, अशी प्रतिक्रिया उमरानच्या वडिलांनी दिली. 

उमरानच्या गावातील लोकांनी त्याच्या वडिलांचा आणि कुटुंबियांचा पुष्पहार घालून सत्कार केला. यासोबतच परिसरात सर्वत्र मिठाईचं वाटप करण्यात आलं.

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील कामगिरी

उमरानने आयपीएलच्या 15 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं. त्याने या मोसमातील 14 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या. उमरानची 25 धावा देत 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

मोसमातील सर्वात वेगवान बॉल टाकणारा बॉलर

उमरान हा आयपीएलच्या 15 व्या हंगामात सर्वात वेगाने बॉल टाकणारा गोलंदाज ठरला. उमरानने 157 च्या वेगाने गोलंदाजी केली आहे. त्याची कामगिरी पाहून त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात निवड करण्यात आली आहे. आता मलिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये कधी स्थान मिळते हे पाहावे लागेल. 

टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम 

टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.

टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *