Ujjwal Nikam : संजय राऊतांना ईडीने घेतले ताब्यात, आता पुढची कायदेशीर प्रक्रिया काय? राऊतांवर कोणती कारवाई होणार? | ed detains sanjay raut what is legal procedure details information by ujjwal nikamतब्बल ९ तासांची छापेमारी आणि चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांवर कोणती कारवाई केली जाणार याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांन सविस्तर माहिती दिली आहे. संजय राऊतांना आात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर राऊत दाद मागू शकतात. तसेच राऊतांना ईडी कोठडी सुनावली जाऊ शकते, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> संजय राऊतांवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “लज्जा, शरम…”

“ईडी जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा तपास करते तेव्हा त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावा असतो. याच पुराव्याच्या आधावर ईडीकडून कारवाई केली जाते. जेव्हा ईडीला सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध झालेला असतो, तेव्हाच ईडी एखाद्या आरोपीला ताब्यात घेते,” असे उज्ज्वल निकम यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला सांगितले.

हेही वाचा >>> NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक

“ईडीकडून अचानकपणे नव्हे तर टप्प्या टप्प्याने कारवाई केली जाते. एखाद्या व्यक्तीविरोधात पुरावा आहे याची खात्री झाल्यानंतरच ईडीकडून अटकेची कारवाई केली जाते. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला कोठडी मिळावी यासाठी ईडीकडून प्रयत्न केले जातात. त्यानंतर कोठडीमध्ये ईडीकडून आरोपीला काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. ईडीकडे जो पुरावा आहे, त्या पुराव्याबद्दलच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न ईडी करते,” अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.

हेही वाचा >>> संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “त्यांना अटक होतेय की…”

“कुठल्याही व्यक्तीला ईडी जेव्हा ताब्यात घेते, तेव्हा आरोपीला २४ तासांच्या आता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करावे लागते. तिथे ईडी कस्टडी मागते. याच ठिकाणी ईडी कस्टडी मिळू नये अशी मागणी आरोपी करु शकतो. माझ्याकडील सर्व माहिती त्यांनी अगोदरच घेतलेली आहे. आता माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, हे पटवून देण्यास आरोप यशस्वी ठरला, तर मग न्यायदंडाधिकारी कोठडी नाकारु शकतात,” असेही निकम यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘महाभारत’ फेम अभिनेते रसिक दवे यांच्या निधनानंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आयुष्य पहिल्यासारखं राहिलं नाही आणि…”

“न्यायालयाकडून ईडी कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडी हा प्रकार असतो. न्यायालयीन कोठीमध्ये असताना आरोपीला जामिनाचा हक्का प्राप्त होतो,” अशी माहिती निकम यांनी दिली.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेही मळलेल्या वाटेनेच; मालेगाव जिल्हा निर्मिती विषयी केवळ सकारात्मकतेचा सूर

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. गेल्या नऊ तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरू होती. अखेर आता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत हे तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply