उघड्या अंगाने वाफाळत्या पाण्यात गेला मराठमोळा अभिनेता; पिळदार शरीर पाहून तरुणी गारद


मुंबई : छोट्या पडद्यावरून कलाक्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता ललित प्रभाकर ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जातो. ललित प्रभाकर सध्या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन करत असतो. ललित प्रभाकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. नुकताच त्याने एक फोटो पोस्ट केलाय. ललित प्रभाकर रणबीर कपूरला टक्कर देतोय की काय? अशी चर्चा रंगली आहे. 

ललित प्रभाकरने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये ललित हा पाठमोरा उभा आहे. त्यासोबत तो शर्टलेस होऊन शॉवर घेत असल्याचेही दिसून येत आहे.

ललितने स्वत:चा शर्टलेस फोटो शेअर त्याला हटके कॅप्शन दिले आहे. तो म्हणाला, ‘प्रश्न पोटा पाण्याचा असला तरी पाठा पाण्याला विसरून चालणार नाही’.

ललितच्या या पोस्टने एकच धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर फक्त चाहत्यांनीच नाही तर इतर कलाकारांनी देखील फोटो पोस्ट केलेत. 

 मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे, निपुण धर्माधिकारी अशा अनेक कलाकारांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

ललित प्रभाकर या अगोदरही असाच एक शर्टलेस फोटो शेअर केला होता. या फोटोवरून असा अंदाज लावला जात आहे की, ललित एखाद्या प्रोजेक्टच प्रमोशन करत असल्याचं देखील म्हटलं आहे. 

ललितने ‘जुळून येती रेशीमगाठी’या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपट काम केले. त्याच्या ‘आनंदी गोपाळ’या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी तो झोंबिवली या चित्रपटात झळकला होता.Source link

Leave a Reply