Headlines

उद्यापासून सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं लागणार; शासनादेश जारी, जाणून घ्या नियम | mahatma gandhi birth anniversarry hello vande mataram Campaign sudhir mungantiwar rmm 97

[ad_1]

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात फोनवर किंवा प्रत्यक्षात संवाद साधताना ‘हॅलो’ऐवजी “वंदे मातरम्” अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ उद्या गांधीजयंतीच्या दिवशी वर्धा येथून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वीपणे राबवण्याचा निर्धार संस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्” नी शासकीय कार्यालयातील अभिवादन फोनवरील संभाषणाच्या सुरुवातीस व्हावे, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं.

राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात फोनवर किंवा प्रत्यक्ष संवादाची सुरुवात “वंदे मातरम्” या संबोधनाने झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकेल, यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. संबंधित नियम पुढीलप्रमाणे…

१. सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून “हॅलो” संबोधन न वापरता, “वंदे मातरम्” म्हणावे.
२. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/ अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला “हॅलो” असे न म्हणता “वंदे मातरम्” असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना “वंदे मातरम्” असे संबोधन करावे.
३. कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस “वंदे मातरम्” हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
४. कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यांगतांनाही सार्वजनिक जीवनात “वंदे मातरम्” ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
६. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
६. विविध बैठका/सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करतांना ती “वंदे मातरम्” या शब्दांनी करावी.

हेही वाचा- ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत घोषित करा, हिंदू महासंघाची मागणी

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत व सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता “वंदे मातरम्” असे अभिवादन करावे, याबाबत आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे. याबाबतचा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *