Headlines

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पालापाचोळा, पानगळ…” | CM Eknath Shinde answer allegations of Shivsena Party Chief Uddhav Thackeray in interview pbs 91

[ad_1]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत पक्षातील बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. बंडखोरांनी मी रुग्णालयात बेशुद्ध असतानाही सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच बंडखोरी करणारे केवळ पालापाचोळा आहे. त्यांची पानगळ होऊन पक्षाला नवीन पालवी फुटेल असा टोलाही लगावला. यावर आता बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या. पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रित त्यावर बोलन. त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे. इतिहास घडवणारे कोण असतात हे लोकांनी पाहिलं आहे.”

“पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार”

“आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी होती. त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर दीपाली सय्यदांची संजय राऊतांकडे मागणी; म्हणाल्या, “त्यांनी एकनाथ शिंदे…”

स्मिता ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “माझी भूमिका ज्यांना पटली ते लोक मला भेटत आहे.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *