Headlines

‘उद्धव ठाकरेंकडे या’ म्हणत रडणारे संजय बांगर आता म्हणतात, ‘”दृष्टीकोन बदला”; खासदार संपर्कात असल्याचा मोठा दावा | Shivsena Sanjay Bangar Hingoli District Head Uddhav Thackeray Eknath Shinde sgy 87

[ad_1]

शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. यानंतर संजय बांगर आक्रमक झाले असून मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. संतोष बागर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आज समर्थकांसह मुंबईसाठी रवाना होणार आहेत. दरम्यान एबीपी माझाशी बोलताना त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवू शकत नाही असं संजय बांगर म्हणाले आहेत.

“आदल्या दिवशी रडणारे आमदार गेले, अशा लोकांना…”; संजय राऊतांचा संतोष बांगर यांच्यावर निशाणा

“मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी प्रसारमाध्यमांमध्ये मला पदावरुन हटवण्यात आल्याचं पाहिलं. पण मी पदावरुन हटलेलो नाही. मी आजही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि उद्याही राहणार”, असं संजय बांगर म्हणाले आहेत.

आधी रडले, मग शिंदे गटात सामील, अचानक निर्णय का बदलला? शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर म्हणाले…

“कोणीतरी उद्धव ठाकरेंची दिशाभूल करत आहे.” असा आरोप संजय बांगर यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला उद्धव ठाकरेंना इतकंच सांगायचं आहे की, दिशाभूल करणाऱ्यांना बाजूला करा. गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. आपण खरंच चांगले नेते आहात”.

“आम्ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केलं असून कोणतीही चूक केलेली नाही. किमान १२ खासदार आमच्या मुख्यमंत्र्यांकडे येणार आहेत. ५० पेक्षा जास्त जिल्हाप्रमुखांच्या मी संपर्कात असून त्यांनी आम्ही तुमच्या बाजूने असल्याचं सांगितलं आहे. अनेक तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखदेखील संपर्कात आहेत. याशिवाय शिवसैनिक, शाखा प्रमुख यांनाही भाजपासोबतची नैसर्गिक युती मान्य आहे,” असा दावा संजय बांगर यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती विभद्र होती असंही ते म्हणाले. आम्ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केलं असून बंडखोर नाही असंही त्यांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरेंच्या मनात आजही माझ्याबद्दल आदर असणार. मातोश्री माझ्यासाठी सर्वस्व असून आजही मी आदर करतो. पण आजुबाजूचे काही लोक त्यांची दिशाभूल करत आहेत. खरी माहिती लपवून ते खोटी माहिती देतात,” असा आरोप संजय बांगर यांनी केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *