उद्धव ठाकरे उभे राहतील तेव्हाच एकनाथ शिंदेही भाषण करणार? शिंदे गट म्हणतो “भाषणाची वेळ…” | Dadar Dussehra Melava Shinde Faction MLA Bharat Gogavle on High Court Decision sgy 87मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली असून, शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेला परवानगी देण्याआधी उच्च न्यायालयाने आमदार सदा सरवणकर यांनी केलेली याचिका फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, यावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची वेळ ठरवू असंही सांगितलं.

हायकोर्टात सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंचा मातोश्रीबाहेर शिवसैनिकांशी संवाद, म्हणाले “तयारीला लागा, गर्दीचा रेकॉर्ड…”

“कोर्टाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. आम्हाला काही चिंता नाही. ठरल्याप्रमाणे बीकेसीमध्ये आमचा कार्यक्रम पार पडेल. शिवाजी पार्कसाठी आमचा आग्रह होता, पण कोर्टाने दिलेला निर्णय मान्य करावा लागेल. आम्हाला वाद निर्माण करायचा नाही. आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार मांडायचे आहेत,” असं भरत गोगावले म्हणाले आहेत.

शिंदे गटाला धक्का! शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

तुमचा शिवाजी पार्क मैदानासाठी आग्रह होता असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “आम्ही मागणी केली होती, जर आम्हाला मैदान दिलं असतं तर आम्ही तिथे मेळावा केला असता. पण बीकेसीही मातोश्रीच्या जवळच आहे. शिवाजी पार्कची मागणी केली होती, म्हणून आग्रह धरला होता”.

विश्लेषण: दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ केव्हा रचली? पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांना होती ‘ही’ भीती

“शिवाजी पार्कला ट्रेनने, गाडीने सोयीस्कर असल्याने कार्यकर्त्यांना त्रास कमी झाला असता. पण बीकेसीत मेळावा घेण्याची आमची तयारी आहे,” असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाची एकच वेळ असेल का? असं विचारलं असता भाषणाची वेळ ठरवू असं त्यांनी सांगितलं.Source link

Leave a Reply