Headlines

भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना संपवायचे अनेक प्रयत्न झाले पण…” | Uddhav Thackeray Interview Ex CM Talks About Why BJP Want to Break Shivsena Party scsg 91

[ad_1]

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्ये भाजपाचं पाठबळ असलेला शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळत आहे. मागील महिन्याभरापासून अनेक आरोपप्रत्यारोप करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमधून बंडखोरीसंदर्भात भाष्य केलं आहे. अनेक विषयांना हात घालताना भाजपाला शिवसेना नेमकी काय फोडायची आहे या प्रश्नालाही ठाकरेंनी उत्तर दिलंय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नक्की वाचा >> “शिवसैनिकांमध्येच लढाई लावून शिवसेना संपवायचा डाव आहे”; फडणवीसांसंदर्भातील त्या घटनेचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा आरोप

“हे का घडवलं?”, असा प्रश्न बंडखोरीसंदर्भात उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “हे घडलं कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे. मी अडीच-अडीच वर्ष म्हणत होतो. तेच तर आता तुम्ही (भाजपाने) केलं. निदान भारतीय जनता पक्षाला पाच वर्षात अडीच वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळालं असतं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी, सध्याचा बंडखोर गट हा खरी शिवसेना नसल्याचं म्हटलं. “आता जी काय सोंगं ढोंग करतायत ही खरी शिवसेना नाहीय. ही सगळी तोडफोड करुनही त्यांचं समाधान होत नाही. त्यांना शिवसेना संपवायचीय. त्यांचा (बंडखोरांचा) वापर करुन त्यांना शिवसेना संपवायची आहे,” असं उद्धव म्हणाले.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

“५६ वर्षात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मात्र त्यांना (भाजपाला) शिवसेना का संपवायची आहे असं आपल्याला वाटतं?”, असा पुढचा प्रश्न राऊत यांनी विचारला. “शिवसेना संपवायचे अनेक प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळेस शिवसेना अधिक जोमाने आणि तेजाने उभी राहिली आहे,” असं सांगत उद्धव यांनी शिवसेना का संपवण्याचा प्रयत्न केला जातोय यासंदर्भातील शक्यता व्यक्त केली. “आता सुद्धा त्यांना हिंदुत्वात भागीदार नको असेल. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व मजबूत होण्यासाठी राजकारण केलं. हे जे करतायत ते राजकारणासाठी हिंदुत्व वापरत आहेत हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. जे विचारतात ना तुमच्या आणि भाजपाच्या हिंदुत्वात फरक काय आहे, तर तो हा आहे. शिवसेनेनं हिंदुत्व मजबूत करण्यासाठी राजकारण केलं. यांनी मात्र यांचं राजकारण मजबूत करण्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला,” असा आरोप उद्धव यांनी केला.

नक्की वाचा >> “बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनच राऊत यांनी, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने हिंदुत्व संकटात आलं, असं जे म्हटलं जातंय त्याबद्दल काय सांगाल?” असा पुढचा प्रश्न विचारला. त्यावर उद्धव यांनीच प्रतिप्रश्न करताना, “हिंदुत्व संकटात आलं म्हणजे नेमकं काय झालं?” असं विचारलं. पुढे उद्धव यांनी, “मला एक प्रसंग किंवा गोष्ट किंवा मी मुख्यमंत्रीपदावर असताना घेतलेला निर्णय दाखवा की ज्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं. एक निर्णय दाखवा,” असं म्हटलं.

पाहा मुलाखत –

हिंदुत्वाच्या मुद्द्याशी जोडून मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा पाढा उद्धव यांनी वाचला. “अयोध्येत आपण महाराष्ट्र भवन करतोय हे हिंदुत्वाला जोडून आहे की नाही? मुख्यमंत्री होण्याआधी, झाल्यानंतरही मी अयोध्येला गेलो. आपण तिरुपती मंदिरासाठी नवी मुंबईत जागा दिली. प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी आपण काम सुरु केलं. गडकिल्ल्यांचं संवर्धन आपण सुरु केलं. आता यात हिंदुत्व कुठे गेलं? असा कोणताही निर्णय नाहीय की ज्यात आपण हिंदुत्वापासून दूर गेलो. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील,” असं माजी मुख्यमंत्री म्हणाले.

नक्की वाचा >> खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? या प्रश्नावर उद्धव म्हणाले, “आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही, निवडणुका येऊ दे…”

तुम्ही आज ज्या संघर्षमय कालखंडातून जात आहात याची कधी अपेक्षा केली होती? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव यांनी, “शिवसेना आणि संघर्ष हे एकमेकांच्या पाचवीला पुजलेले आहेत,” असं उत्तर दिलं.”मागे कोणीतरी असं म्हटलं होतं की शिवसेना ही तळपती तलवार आहे. ती जर म्यानेमध्ये ठेवली तर ती गंजते. त्यामुळे ती तळपली पाहिजे. तलवार तळपणे म्हणजे संघर्ष आलाय. आता याचा शब्दश: अर्थ कोणी घेऊ नये. तलवारीने वार करा वगैरे असं माझं म्हणणं नाही. ही एक उपमा आहे,” असं उद्धव म्हणाले. तसेच, “संघर्षासाठीच शिवसेना जन्माला आली. त्यावेळी मराठी माणसासाठी, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनाचा जन्म झाला. नंतर शिवसेना हिंदुत्वासाठी लढली. मग ते १९९२-९३ किंवा कधीही असेल. जिथे अन्याय तिथे वार हे शिवसेनेचं ब्रिद वाक्य आहे,” असंही त्यांनी म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *