Headlines

उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक आमदार फुटला; विश्वासदर्शक ठरावाच्या आधी थेट मुख्यमंत्री शिंदेंसोबत विधानसभेत दाखल | Shiv Sena MLA of Uddhav Thackeray faction Santosh Bangar join CM Eknath Shinde and MLAs scsg 91

[ad_1]

Floor Test Today, Santosh Bangar Latest News: उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीचे आमदार असलेले संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संतोष बांगर दिसल्याचे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

नक्की वाचा >> मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, ‘या’ दोन कारणांमुळे शिंदे सरकार केव्हाही पडू शकते; शरद पवारांनी दिला इशारा

थेट मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांसोबत आज विधानभवनामध्ये विजयी झाल्याच्या संकेत दर्शवत बांगर यांनी प्रवेश केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीच शिवसेनाला हा धक्का बसलाय.

नक्की वाचा >> “स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला लाभलेल्या राज्यपालांपैकी हा एक नंबरचा बोगस राज्यपाल”; कोश्यारींना अपक्ष आमदाराने केलं लक्ष्य

बांगर हे शिंदे गटात गेल्याने शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली आहे. तर उद्धव ठाकरे गटातील आमदारांची संख्या १५ वर आली आहे. २१ जून रोजी शिंदे बंडखोरी करुन सुरतला गेले. तिथून २२ जून रोजी ते गुवाहाटीमध्ये दाखल झाले.

नक्की वाचा >> “भगतसिंग यांच्या फाशीनंतर ब्रिटिशांना आनंद झाला तसा…”; शिवसेनेकडून कठोर शब्दांमध्ये राज्यपाल कोश्यारींवर टीका

त्यानंतर पुढील आठ दिवसांमध्ये एक एक करुन तब्बल ३९ शिवसेना आमदार आणि ९ अपक्ष आमदारांनी गुवाहाटी गाठत शिंदेंना समर्थन दर्शवत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ३० तारखेच्या मध्यरात्री हे आमदार गोव्यात दाखल झाले. त्यानंतर दोन तारखेला हे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले. विधान परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक शिंदे सरकारने जिंकली आणि विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विराजमान झाले. आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाआधी शिंदे गटामध्ये बांगर यांच्या रुपाने आणखी एक आमदार सहभागी झाल्याने शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *