Headlines

उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा, विधानपरिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता | Shivsena Uddhav Thackeray Ambadas Danve Opposition Leader Vidhan Parishad sgy 87

[ad_1]

राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु असताना सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असून पक्षाचं चिन्ह मिळावं यासाठी संघर्ष सुरु आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवेसना पक्षास अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसंच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आधी ‘पक्षप्रमुख’ उल्लेख टाळला, आता थेट ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत एकनाथ शिंदे म्हणाले…

राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे.

विधानपरिषदेत शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी असे पत्र शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *