udayan raje bhosale reaction on jagdamba sword back to india spb 94छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत बोलताना ”ब्रिटीश सरकारने मोठ्या मनाने ती तलवार परत करायला हवी, त्यासाठी भारत सरकाने प्रयत्न करायला हवे, अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. ते आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – ब्रिटनमधून शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

नेमकं काय म्हणाले उदयनराजे?

“संपूर्ण जगभरात प्रत्येकाच्या भावना शिवरायांच्या ‘भवानी’ आणि ‘जगदंबा’ तलवारीशी जुळल्या आहेत. प्रत्येकाला वाटते की ती भारतात यावी. ती सध्या इंग्लंडमध्ये जिथे ठेवली आहे, तिथे प्रचंड सुरक्षा आहे. मी स्वत: ते सर्व बघितलं आहे. ती तलवार आता मोठ्या मनाने ब्रिटीश सरकारने परत करायला हवी, त्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे”, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

हेही वाचा – Video: बऱ्याच दिवसांनंतर अजित पवारांची सार्वजनिक कार्यक्रमात; नाराजी, आजारपणाबद्दल विचारल्यावर म्हणाले, “काहीही फालतू…”

यावेळी बोलताना त्यांनी काल प्रतापगडाच्या पायथ्याशी असेलल्या अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातही प्रतिक्रिया दिली. “शिवाजी महाराजांचा आयुष्यभराचा प्रवास जर आपण बघितला, तर त्यांनी नेहमीच प्रत्येकाचा मान सन्मान केला. त्यांच्यावर हल्ला करायला आलेल्या माणसाला तिथे जागा दिली. त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं. मात्र, इतका मोठा विचार आपण कोणीच करू शकलो नसतो. पण त्यांनी केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर बांधली. आज त्याला एवढे वर्ष लोटून गेले. ती खरं तर आता मोकळी केली पाहिजे. तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीसाठी जिवंत ठेवला पाहिजे. त्याठिकाणी जे बांधकाम झालं आहे. ते वनविभागाच्या जागेवर आहे. ते एकप्रकारे अतिक्रमण होतं. त्यामुळे अतिक्रमण म्हटल्यावर शासनाने जी कारवाई करायला हवी, ती केली”, असेही ते म्हणाले.Source link

Leave a Reply