त्याने बंद रेल्वे फाटकाखालून बाईक नेली, तितक्यात ट्रेन आली, पुढे काय झालं… पाहा काळजाचा थरकाप उडवणार VIDEO


Viral Video : बातमी आहे एका विचित्र अपघाताची. एका बाईकस्वाराने रेल्वे फाटक पडलेलं असतानाही त्यानं फाटकाखालून बाईक नेली. सगळेजण हा नक्की काय करतोय हे पाहत होते. पण, हा बाईकस्वार ऐकेल तर कसला, तेवढ्यातच ट्रेन आली.  काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?
वेळ संध्याकाळची सव्वा सहाची…रेल्वेचं फाटक बंद होतं…सगळेजण रेल्वे कधी जातेय आणि फाटक कधी उघडणार याचीच वाट पाहत होते. त्याचवेळी एक बाईकस्वार घाईघाईनं आला. याला इतकी घाई होती, की यानं फाटका खालून बाईक नेली आणि पुन्हा भरधाव वेगानं निघाला.

याची पटरी क्रॉस करण्याची आणि ट्रेन येण्याची वेळ एकच होती.  पटरीवरून ट्रेन येतेय हे दिसताच यानं करकचून बाईकचे दोन्ही ब्रेक दाबले आणि बाईक जागच्या जागीच थांबवली. आणि त्याने बाईकवरुन बाजूला उडी मारली. पण, भरधाव वेगानं येणा-या ट्रेननं याच्या बाईकला धडक दिल्याने बाईकचा चुराडा झाला.

एक सेकंद जरी वेळ चुकली असती तर हा तरूण ट्रेनखाली चिरडला असता. पण, याचं नशीब बलवत्तर म्हणून एवढ्या मोठ्या संकटातून थोडक्यात बचावला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ शनिवारचा आहे. काहीजण हा व्हिडीओ मुंबईतला असल्याचं बोलतायत. तर काहीजण पंजाबमधील असल्याचं बोलतायत.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून, तो कुठला आहे हे नक्की कळू शकलेलं नाही. मात्र, अशा अतिहुशारीनं जीवही जाऊ शकतो. त्यामुळे रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना खबरदारी घ्या. नाही तर अतिघाई तुमचा जीव घेईल. Source link

Leave a Reply