Headlines

त्यांना समजलं पाहिजे की…; श्रीलंकेविरूद्धच्या पराभवानंतर ‘या’ खेळाडूंवर संतापला Rohit Sharma

[ad_1]

दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रोजी दुबईत भारत विरूद्ध श्रीलंका (IND vs SL)  असा सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला. श्रीलंकेने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय टीमने श्रीलंकेसमोर 174 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. हे यश मिळवण्यात दसून शकना यांच्या टीमला यश आलं. या पराभवामुळे टीम इंडियाचं आशिया कपमधील (Asia Cup 2022) आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. (Rohit Sharma angry on Rishabh pant and Hardik pandya after shrilanka loss )

टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी, या सामन्यातील पराभवानंतर, सामन्यानंतरच्या सेरेमनीमध्ये बोलताना रोहितने टीमची चुक कुठे झाली याबाबत सांगितली आहे.

रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही 10-15 रन्स करण्यासाठी कमी पडलो. सेकंड हाफ आमच्यासाठी चांगला झाला नाही. जे खेळाडू मध्येच आऊट झाले त्यांनी समजून घ्यावं की, कोणते शॉट्स खेळू शकतो. अशा पराभवातून आपण शिकू की टीम म्हणून काय काम केलं पाहिजे. एकंदरीत पाहता शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना नेण्याचा चांगला प्रयत्न होता.”

रोहित पुढे म्हणाला, “स्पिनर्सने आक्रमक गोलंदाजी केली आणि मधल्या ओव्हर्समध्ये विकेट्स मिळवल्या. मात्र श्रीलंकेने त्यांचा उत्साह कायम ठेवला. श्रीलंकेच्या उजव्या हाताच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला. पण मी तिन्ही वेगवान गोलंदाजांवर खूश होतो.”

रोहित शर्माच्या नावे रेकॉर्ड्स

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली लवकर आऊट झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit sharma) बॅटींगची बाजू सांभाळली.  रोहित शर्माने 41 चेंडूत 72 रन्स केल्या. या खेळीत रोहितने 5 फोर आणि 4 सिक्स मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 175 होता. आपल्या या शानदार खेळीमुळे रोहित शर्माने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *