Headlines

‘त्या’ एका चुकीमुळं बॉलिवूडच्या धनवान अभिनेत्याच्या नशिबी दारिद्र्य; चाळीत घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

मुंबई : असं म्हणतात की, नशिबाची खेळी कधी कोणता दिवस दाखवेल याचा काही नेम नाही. आज एखाद्याचे चांगले दिवस आहेत तोच उद्या तुम्हाला वाईट परिस्थितीमध्ये दिसू शकतो. त्यामुळं नियतीची थट्टा न केलेलीच बरी. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अशा सेलिब्रिटीनंही त्यांच्या जीवनात ही परिस्थिती पाहिली. 

हे अभिनेते म्हणजे भगवान दादा (Bhagwan Dada). ‘भोली सुरत दिल के…’ हे गाणं आठवल्यानंतर भगवान दादा आणि त्यांचा हसरा चेहरा आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर येतो. सुरुवातीला मिलमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्यानं लहानसहान भूमिकांतून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. (bollywood veteran Actor Bhagwan Dada birth anniversary)

 पाहता पाहता प्रसिद्धीझोतात आलेल्या भगवान दादा यांनी जागृती पिक्चर्स नावाची निर्मिती संस्था सुरु केली. ज्यामाध्यमातून त्यांनी ‘अलबेला’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. चित्रपट 50 हून अधिक आठवडे थिएटरमध्ये गाजला. 

यश भगवान दादांच्या घरात नांदू लागलं. त्यांनी मुंबईतील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये समुद्रकिनारी असणारा बंगला खरेदी केला. यामध्ये 25 खोल्या होत्या. त्यांच्याकडे 7 आलिशान कारही होत्या. आठवड्याच्या दर दिवशी ते नवी कार वापरत होते. 

‘अलबेला’नंतर त्यांनी ‘झमेला’सारखे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आणले. पण, चित्रपट चाललाच नाही. पुढे भगवान दादांनी किशोर कुमार यांच्या साथीनं ‘हंसते रहना’ची निर्मिती केली. यासाठी त्यांनी पत्नीचे दागिनेही गहाण ठेवले. आयुष्यभराची कमाई या चित्रपटावर लावली. पण, किशोर कुमार यांच्या विक्षिप्त स्वभावामुळं हा चित्रपट अर्ध्यावरच बंद झाला. 

भगवान दादांचा प्रवास उलट्या दिशेनं सुरु झाला. त्यांच्या पैशांवर आयुष्याची मजा लुटणाऱ्या कैक मित्रांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. आर्थिक संकटापोटी अखेर भगवान दादांना त्यांचा बंगला आणि कार विकाव्या लागल्या. शेवटी त्यांनी दादरमधील एका चाळीत राहण्यास सुरुवात केली. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला यावेळी अविवाहित मुलगी आणि लहान मुलाच्या कुटुंबानं त्यांची काळजी घेतली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *