त्या 6 सेलिब्रिटी ज्या लग्नापूर्वीच राहिल्या प्रेग्नेंट, आता असं जगतायत आयुष्य


मुंबई : अभिनय किंवा मॉडलिंग क्षेत्रातील लोक आपली फिगर खराब होऊ नये म्हणून गरोदर रहाणं टाळतात किंवा यासाठी उशीर करतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अशा काही अभिनेत्री किंवा सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी आपल्या लग्नापूर्वीच प्रेग्नेन्ट होणं स्वीकारलं आहे. म्हणजेच या सेलिब्रिटींनी प्रेग्नेंट राहण्यासाठी आपल्या लग्नाची देखील वाट पाहिली नाही. आज आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींची नावं आणि त्यांच्या प्रेग्नेंसिचे फोटो शेअर करणार आहोत. जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

या यादीत पहिला क्रमांकावर आहे हार्दिक पांड्या आणि नताशा. हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या लग्नापूर्वीच आई-वडिल होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या जोडप्याने लग्नापूर्वीची गर्भधारणा मोठ्या उत्साहाने स्वीकारली आणि अभिनेत्रीने सुंदरल मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव अगस्त्य आहे.

हार्दिक-नताशा

कल्की कोचलिननेही तिच्या लग्नाशिवाय मुलाला जन्म दिला आहे. अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्कीने बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गच्या मुलाला जन्म दिला.

कल्कि कोचलिन

लग्नाआधीच अर्जुन रामपालला बाबा झाला होता. खरंतर अर्जुन रामपाल गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेट करत होता. परंतु त्याचा घटस्फोट निश्चित झाला नव्हता. त्यामुळेच तो गॅब्रिएलासोबत लग्न करू शकला नाही. ज्यामुळे तो लग्ना आधीच बाबा झाला आहे.

अर्जुन रामपाल-गैबरिएला

दिया मिर्झाने तिच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते, तर तिच्या लग्नानंतर लगेचच तिने तिचा बेबी बंप दाखवून सर्वांना थक्क केले. लग्नाआधीच्या प्रेग्नेंसीबद्दलही अभिनेत्री अनेक मुलाखतींमध्ये मोकळेपणाने बोलली आहे.

दीया मिर्जा-वैभव रेखी

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचाही या यादीत समावेश आहे. नेहा धुपियाने घाईघाईत लग्न केले आणि त्यानंतर तिचे बेबी बंप फोटोशूट शेअर करताना आनंदाची बातमी शेअर केली. नेहाने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या लग्नापूर्वी झालेल्या प्रेग्नेंसीबद्दल वक्तव्य केलं आहे.

नेहा धूपिया-अंगद बेदी

नुसरत जहाँने केवळ प्रियकर यश दास गुप्ताच्या मुलाला जन्म दिला नाही, तर त्यांची परिस्थिती सामाजिकदृष्ट्याही खूप वेगळी होती. नुसरतने तुर्कस्तानमध्ये बिझनेसमन निखिल जैनशी लग्न केले, तर ती आता यशदास गुप्तासोबत कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे.

नुसरत जहांSource link

Leave a Reply