त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस यांची भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री शिंदे या…” | Devendra Fadnavis Raj Thackeray Meet ncp mahesh tapase comment about 40 eknath shinde rebel mla connection scsg 91 | Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News
त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस यांची भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री शिंदे या…” | Devendra Fadnavis Raj Thackeray Meet ncp mahesh tapase comment about 40 eknath shinde rebel mla connection scsg 91 | Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस यांची भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री शिंदे या…” | Devendra Fadnavis Raj Thackeray Meet ncp mahesh tapase comment about 40 eknath shinde rebel mla connection scsg 91मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने या भेटीचं कनेक्शन शिंदे गटातील त्या ४० आमदारांसंदर्भातील चर्चाशी जोडलं आहे. शिवसेनेमध्ये बंड करुन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपासोबत सरकार स्थापन करणाऱ्या ४० बंडखोर आमदारांचा मनसेमध्ये समावेश करुन घेण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली की काय अशी शंका राष्ट्रवादीने उपस्थित केलीय.

नक्की पाहा >> Photos: ‘शिवतीर्थ’वर फडणवीसांचं औक्षण, भगवी शाल अन्…; राज ठाकरेंच्या घरी असा झाला उपमुख्यमंत्र्यांचा पाहुणचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज आणि फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना ४० आमदारांचा मुद्दा उपस्थित केला. एकनाथ शिंदे नेतृत्व करत असणाऱ्या ४० आमदारांना भाजपामध्ये जायचं नसल्याने त्यांना मनसेमध्ये सामावून घेण्यासंदर्भातील चर्चा राज आणि फडणवीस यांच्यामध्ये झाली की काय अशी शंका तापसे यांनी व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का?; शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य हे सर्व आमदारांच्या…”

“शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केला. हे आमदार कुठल्या पक्षात जातील याबद्दल उत्सुकता होती. हे आमदार भाजपामध्ये यावेत असा भाजपाचा प्रयत्न होता. पण आमदार भाजपामध्ये जायला तयार नाहीत. असं म्हटलं गेलं ते आमदार प्रहारमध्ये जातील पण ती परिस्थिती राहिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बंडखोर आमदारांच्या गटाचं नेतृत्व करतायत. हे ४० आमदार नेमक्या कुठल्या गटाचे किंवा पक्षाचे आहेत? हा प्रश्न निर्माण झालाय,” असं तापसे म्हणाले. प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून त्यांनी ही शंका उपस्थित केली.

नक्की पाहा >> Photos: २०२० मध्ये शिंदेंचाच होता विरोध अन् काल मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच केली ‘या’ निर्णयाची घोषणा; BJP ला होणार मोठा फायदा

पुढे बोलताना तापसे यांनी, “सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापिठाची स्थापना होऊन कायदेशीर लढाईला सुरुवात होणार आहे. त्यानंतरच हे सरकार वैध्य आहे की अवैध्य आहे हे आपल्याला कळेल. हे ४० आमदार मनसेमध्ये जातील का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव फडणवीस राज ठाकरेकडे घेऊन गेले का असा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो,” असंही म्हटलं. “ज्या पक्षाकडे एकच आमदार आहे तो पक्ष एका रात्रीत ४० आमदारांचा मालक होतो का अशा उलट सुलट चर्चा राज्यामध्ये सुरु झाल्यात. वास्तविक त्यांची काय चर्चा झाली माहिती नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यासाठी सक्षम आहे. शरद पवारांपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वच जण पक्ष मजबूत करण्यासाठी काम करतोय,” असंही तापसे म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

दरम्यान, दुसरीकडे ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ही भेट घेतली व त्याबाबत विधिमंडळातच मी जाहीर केले होते. अन्य पक्षातील राजकीय नेत्यांशी संबंध ठेवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी राज ठाकरे यांना भेटल्याने कोणालाही मळमळ होण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.Source link

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Recent Posts

Horoscope 27 November : या राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामं मार्गी लागतील!

Horoscope 27 November : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि…

3 hours ago

‘गंदी बात’ फेम Anveshi Jain चा बोल्ड VIDEO आला समोर

मुंबई : अल्ट बालाजीवरील (Alt Balaji) प्रसिद्ध वेबसीरीज 'गंदी बात'ने (Gandi Baat) अक्षरश प्रेक्षकांना वेड…

4 hours ago

IND vs NZ : Hardik Pandya चं मोठं पाहिलंत का? बस ड्रायव्हर दिलं खास गिफ्ट

IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 सामन्याची…

4 hours ago

Glenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात “या खेळाडूला कॅप्टन करा”

Glenn McGrath On David Warner: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) यजमान ऑस्ट्रेलियाला सुपर 12…

6 hours ago

प्रसिद्ध अभिनेत्रीचा बोल्ड फोटो आला समोर, Photo पाहून चाहते थक्क

Malaika Arora : मलायका अरोराला (Malaika Arora) तिच्या फिटनेससाठी (Fitness) बॉलिवूडमध्ये (Bollywood) ओळखले जाते. तिनं…

6 hours ago

Ind Vs NZ : हेमिल्टनमध्ये Arshdeep Singh चा भांगड्याने जिंकलं सर्वांचं मन, व्हिडीओ व्हायरल

India vs New Zealand 2nd Odi: उद्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind Vs NZ) यांच्यात दुसरी…

6 hours ago