Headlines

Twitter ला टक्कर देणाऱ्या Mastodon वर असं बनवा अकाउंट, पाहा सोपी ट्रिक्स

[ad_1]

नवी दिल्लीः Elon Musk यांनी ट्विटर Twitter ची खरेदी केल्यानंतर एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे कोट्यवधी ट्विटर यूजर्स चिंतीत झाले आहेत. ट्विटरवरील ब्लू टिकसाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे अनेक ट्विटर यूजर्स चिंतीत आहेत. तर ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसण्यास सांगितल्याने अनेक जणांची धावपळ उडाली आहे. अनेक जण आता ट्विटरला पर्याय शोधत आहेत. या दरम्यान मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Mastodon ने अनेक यूजर्सला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी मॅस्टोडॉन Mastodon वर अकाउंट कसे बनवायचे यासंबंधी माहिती देत आहोत.

Mastodon एक ओपन-सोर्स मायक्रोब्लॉगिंग साइट आहे. जी डिस्कॉर्ड समान आहे. हे प्लॅटफॉर्म यूजर्सला आपले विचार शेअर करण्यासाठी एड-फ्री स्पेस उपलब्ध करते. हे सर्व यासाठी डेडिकेटेड कम्यूनिटी सर्वरद्वारे होते. हे कोणतेही यूजर ज्वॉइन करू शकतो. सर्वर बनू शकतो. “toots” (ट्वीट करणे) पोस्ट करू शकतो. दुसरे यूजर्स आणि ऑर्गनायझेशनला फॉलो करू शकतो. दुसऱ्या पोस्टला फेव्हरेट (लाइक करणे) आणि बूस्ट (रिट्विटर करणे) करू शकतो.

Android-iOS साठी एकसारखी प्रोसेस
Mastadon वर आपले अकाउंट बनवणे खूप सोपे आहे. याचे खास वैशिष्ट्ये अँड्रॉयड आणि iOS वर अकाउंट बनण्यासाठी एक सारखी प्रोसेस आहे. तुम्हाला फक्त एक यूजरनेम, ईमेल अड्रेस आणि पासवर्ड टाकावे लागते. यानंतर चेक बॉक्स वर क्लिक करून कंपनीचे नियम आणि अटी शर्थी मानाव्या लागतात.

वाचाः लागा तयारीला!, iPhone 15 मॉडलची किंमत ‘इतकी’ असणार, फीचर्सही झाले लीक

Mastadon वर अकाउंट बनवण्यासाठी १० स्टेप

१. प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरवरून Mastadon डाउनलोड करा.
२. आता अॅप ओपन करा. नवीन अकाउंट बनवण्यासाठी गेट स्टार्टेड वर क्लिक करा.
३. Mastadon तुम्हाला प्लॅटफॉर्म वर काही सर्व्हर दिसेल. येथून तुमच्या आवडीचे सर्व्हर निवडू शकता.
४. सर्व्हर निवडल्यानंतर नेक्स्टवर टॅप करा.
५. प्लॅटफॉर्मवर काही नियम दिसतील. ते वाचून नंतर नेक्स्टवर क्लिक करा.
६. आपले नाव, Mastadon साठी प्रोफाइल आयडी, ईमेल आणि प्रोफाइल पासवर्ड एड करा.
७. तुमच्याकडून नोंदवलेल्या ईमेलवर Mastadon एक व्हेरिफिकेशन लिंक पाठवली जाईल.
८. थोडी वाट पाहा. आपल्या मेल इनबॉक्स किंवा स्पॅम फोल्डरमध्ये ही लिंक शोधा. त्यावर क्लिक करा.
९. ईमेल व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्ही Mastadon च्या होम पेजवर येवू शकता.
१०. आता निवडलेल्या सर्व्हरच्या माहितीनुसार, लोकांची पोस्ट पाहू शकता.

वाचाः तुमच्या नावाने मार्केटमध्ये किती SIM कार्ड आहेत Active, या सोप्या ट्रिकने जाणून घ्या

वाचाः ५३ हजारांचा स्मार्टफोन मिळतोय अर्ध्यापेक्षा कमी किमतीत, फोनमध्ये 108 MP Camera, मजबूत बॅटरी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *