Headlines

तुम्हालाही रात्री 2- 3 वाजता जाग येते? पाहा त्याविषयी ज्योतिष काय सांगतं

[ad_1]

मुंबई : (Sleep) रात्रीची झोप अनेकदा इतकी गाढ असते, की थेट गजर झाल्यावरच बऱ्याचजणांना जाग येते. काहींची झोप इतकी अनावर होते, की गजर वाजो किंवा ढोलताशे, त्यांना जागच येत नाही. ही मंडळी त्यांना हवं त्याच वेळेत उठतात. पण, काहीजण मात्र याला अपवाद ठरतात. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर कितीही गाढ झोप लागलेली असो, त्यांना ठराविक वेळेत जाग येतेच. तुम्हाला माहितीये का, यामागे काही संकेत दडलेले असतात. हे संकेत काय, ते एकदा पाहाच… (Why people wakes up at midnight know the spiritual reason behind that)

– काहीजणांना रात्री 8 वाजताच झोपण्याची सवय असते. पण, त्यांना लगेचच 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान जाग येते. याचा अर्थ या व्यक्तींना प्रचंड मानसिक तणाव आहे. या परिस्थितीत त्या व्यक्तींनी थंड पाण्यानं हात-पाय आणि चेहरा धुवावा. 

– रात्री 11 ते 1 दरम्यान जाग आल्यास समजावं त्या व्यक्तीनं एखादं वाईट स्वप्न पाहिलंय. अशा वेळी नकारात्मक विचारांपासून दूर राहणंच योग्य. 

– कोणत्याही व्यक्तीला रात्री 12 ते 2 वाजण्याच्या सुमारास जाग आल्यास हा कोणा एका शक्तीच्या दिशेनं असणारा इशारा मानला जातो. ही एक अशी शक्ती असते, ज्यामुळं आयुष्याविषयी तुमची जागरुकता वाढते. (Midnight Sleep Disturbance)

– मध्यरात्र उलटून गेल्यानंतर 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान तुम्हाला जाग आल्यास हा प्रचंड संतापाचा इशारा आहे. त्यामुळं तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे. 

 

– तुम्ही जर रात्री 3 वाजता खाडकन जागे होत असाल, तर तुम्ही त्यावेळी ईष्ठदेवतेची आराधना करणं अपेक्षित आहे. 

– पहाटे 4- 5 च्या सुमारास जाग आल्यास तुमच्या आजुबाजूला अनोळख्या शक्तींचा वावर असून, त्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा आहे, असं समजा. तुम्हाला या वेळेत जाग आल्यास देवाच्या नावाचा जप करा. 

– गाढ ढोपलेलं असताना अचानकच सकाळी 5 ते 7 दरम्यान तुम्हाला जाग आल्यास ही बाब भावनिकतेकडे लक्ष वेधते. अशा वेळी तुम्ही ध्यानधारणा करून अडचणी दूर करु शकता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *