तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या मदतीने मिनिटात मिळेल सर्व माहिती


नवी दिल्ली: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्याकाही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगार नवनवीन पद्धतींचा वापर करून फसवणूक करत आहेत. अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या तुमच्या ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड देखील घेऊ शकतात. या मोबाइल क्रमाकांचा वापर चुकीच्या कामासाठी केल्यास याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. याशिवाय, या नंबरचा वापर करून गुन्हेगार बँक खाते देखील रिकामे करू शकतात. आधार कार्डच्या मदतीने नवीन सिम कार्ड घेणे हे खूपच सोपे आहे. त्यामुळे तुमच्या नावावर कोणी कोणी सिम कार्ड घेतले आहे हे आपल्याला माहिती नसते. मात्र, तुम्ही एका सोप्या पद्धतीने ही माहिती जाणून घेऊ शकता.

वाचा: चीनमध्ये अवघ्या सेकंदात आउट ऑफ स्टॉक झालेल्या स्मार्टफोनची भारतात एन्ट्री, फीचर्स एकदम भारी

अनेकदा गुन्हेगार ओळखपत्रावरील माहिती बदलतात. ते ओळखपत्रावरील फोटो, पत्त्यात बदल करू शकतात व याचा वापर कर्जासाठी, बँक खाते उघडण्यासाठी करू शकतात. या कामासाठी आधार, पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग केला जाऊ शकतो. तुमच्यावर किती सिम कार्ड आहेत, हे जाणून घ्यायचे असल्यास दूरसंचार विभागाने (DoT) एक पोर्टल सुरू केले आहे. सध्या ही सुविधा फक्त तेलंगाना आणि आंध्रप्रदेश या राज्यात उपलब्ध आहे. फसवणूक टाळणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या आधारवर रजिस्टर असलेल्या सर्व फोन नंबर्सची माहिती मिळेल.

तसेच, एखादा नंबर तुम्हाला अनधिकृत वाटत असल्यास तुम्ही DoT कडे तक्रार करून ब्लॉक करू शकता. तसेच, तुमच्या अन्य कागदपत्रांचा चुकीच्या कामासाठी उपयोग केला जात नाहीये ना, हे तपासण्यासाठी क्रेडिट रिपोर्ट पाहा. क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणतीही संशयास्पद रक्कम दिसत नाही ना, हे तपासा. या रिपोर्टमध्ये रजिस्टर फोन नंबर आणि ईमेलची देखील माहिती मिळते. तुम्हाला जर कोणतीही माहिती संशयास्पद वाटल्यास क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधू शकता. तसेच, पोलिसात देखील तक्रार करू शकता. तसेच, तुम्ही दर तीन महिन्यांनी मोफत क्रेडिट रिपोर्टची माहिती घेऊ शकता.

वाचा: एकच नंबर! Jio ने लाँच केले दोन नवीन प्लान्स, वर्षभराच्या वैधतेसह मिळेल Disney+Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन

वाचा: भारतात धुमाकूळ घालायला येतोय ४८ MP कॅमेरासह Samsung Galaxy A03, किंमत ११ हजारांपेक्षा कमी

वाचा: जुन्या स्मार्टफोनला हवी तशी किंमत मिळत नाहीये? बेस्ट रिसेल व्हॅल्यू मिळविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Source link

Leave a Reply