तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम कार्ड घेतले आहे? या वेबसाइटवर मिळेल सर्व माहिती


नवी दिल्ली :Aadhaar Card हे महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे हे असणे गरजेचे आहे. आधारचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. याच्या मदतीने नवीन सिम कार्ड खरेदी करता येते. अनेकदा आपल्या आधार कार्डवर सिम जारी केले जाते. परंतु, याबाबत आपल्याला काहीच माहित नसते. यामुळे अनेकदा फसवणुकीच्या तक्रारी देखील समोर येतात. आधार कार्डचा वापर हा सुरक्षितपणे करायला हवा. तसेच, इतरांना आधार कार्ड अथवा आधार कार्डची कॉपी देताना काळजी घ्यायला हवी. तुमच्या आधार कार्डवर देखील किती जणांनी सिम कार्ड घेतले आहे हे जाणून घेण्यासाठी एक सोपी प्रोसेस उपलब्ध आहे. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

वाचा: फोटोचे बॅकग्राउंड अवघ्या एका मिनिटात करा रिमूव्ह, ‘ही’ सोपी प्रोसेस येईल खूपच उपयोगी

DoT च्या वेबसाइटवर मिळेल माहिती

तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम कार्ड घेतले आहे, हे जाणून घेण्यासाठी DoT ची मदत घ्यावी लागेल. या पोर्टलला टेलिकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर अथवा TAFCOP नाव देण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्हाला आधारवर जारी सिम कार्डची माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/ च्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाका. आता तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल.

वाचा: Motorola चा धमाका! तब्बल २०० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लाँच करणार स्मार्टफोन, चार्जिंग देखील सुपर फास्ट

ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित सर्व फोन नंबरची लिस्ट येथे दिसेल. जर एखादा अनोळखी नंबर असल्यास तुम्ही तो बंद करण्यासाठी विनंती देखील करू शकता. यासाठी तुम्हाला त्या नंबरच्या समोर दिलेल्या ब्लॉक आणि रिपोर्टच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मात्र, लक्षात ठेवा की ही सर्विस सध्या संपूर्ण देशात उपलब्ध नाही. ठराविक राज्यातील नागरिक या सर्विसचा लाभ घेऊ शकतात. लवकरच संपूर्ण देशात ही सर्विस उपलब्ध होईल.

वाचा -Noise ची भन्नाट स्मार्टवॉच लाँच, किंमत कमी फीचर्स जबरदस्त, खरेदीवर मिळेल १ वर्षाची वॉरंटी

Source link

Leave a Reply