Headlines

तुमचे पॅन कार्ड वापरून इतर कोणी कर्ज तर घेतले नाही? ‘या’ सोप्या प्रोसेसने मिळेल सर्व माहिती

[ad_1]


नवी दिल्ली : पॅन कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. ओळखपत्रासोबत हे आर्थिक व्यवहारांसाठी देखील उपयोगी येते. मात्र, इतर कोणी तुमच्या पॅन कार्डचा वापर चुकीच्या कामासाठी करत असेल तर? असाच काहीसा प्रकार अभिनेता राजकुमार रावसोबत देखील घडला. त्याने माहिती दिली की, त्याच्या पॅन कार्डचा वापर करून कोणीतरी फिनटेक अ‍ॅपच्या मदतीने पर्सनल लोन घेतले होते. राजकुमार रावने माहिती दिली की, त्याच्या पॅन कार्डचा वापर करून २,५०० रुपयांचे कर्ज घेतले आहे. यामुळे CIBIL स्कोरवर परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वी Sunny Leone ने देखील अशीच तक्रार केली होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार खासगी माहिती चोरी करून लोकांची फसवणूक करत आहे. अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये सायबर गुन्हेगार इतरांच्या पॅन कार्डच्या (PAN Card Loan Fraud) मदतीने कर्ज घेतात. त्यामुळे तुमच्याकडे देखील पॅन कार्ड असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. इतर अनोळखी व्यक्ती तुमच्या PAN Card चा चुकीचा वापर तर करत नाही ना? हे तुम्ही जाणून घेऊ शकता. याबाबतची प्रोसेस जाणून घेऊया.

चेक करा CIBIL स्कोर

तुमच्या पॅन कार्डचा चुकीच्या कामासाठी वापर होत आहे की नाही, हे तपासण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमचा CIBIL स्कोर चेक करा. तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स CIBIL, Equifax, Experian आणि CRIF High Mark द्वारे स्कोर तपासू शकता. CIBIL स्कोर तपासून तुमच्या नावावर कोणी कर्ज घेतले आहे की नाही याची माहिती मिळेल.

Paytm वरून मिळेल मदत

तुम्ही फिनटेक प्लॅटफॉर्मची देखील मदत घेऊ शकता. Paytm आणि पॉलिसी बाजार सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या पॅन कार्डवर कर्ज घेतले आहे की नाही हे समजेल. या प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला फायनेंशियल रिपोर्ट तपासण्याचा पर्याय मिळतो. येथून तुम्हाला सहज CIBIL स्कोर आणि कर्जाची माहिती मिळेल.

Form 26A तपासा

तिसरी पद्धत म्हणजे Form 26A तपासा. म्हणजेच, तुमच्या PAN Card वर कोणी कर्ज घेतले आहे की नाही हे तुम्ही Form 26A द्वारे तपासू शकता. हे एक एन्यूअल टॅक्स स्टेटमेंट आहे, जे आयकर विभागाद्वारे जारी केले जाते. यामध्ये तुमचा इनकम टॅक्स रिटर्न रेकॉर्ड आणि पॅन कार्डद्वारे झालेल्या इतर आर्थिक व्यवहारांची माहिती असते. या पद्धतीने तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतले आहे की नाही, हे जाणून घेऊ शकता.

वाचा: मोफत घ्या Netflix, Hotstar आणि Prime सबस्क्रिप्शनचा आनंद, Jio च्या ‘या’ प्लानमध्ये मिळतील अनेक फायदे; किंमत फक्त…

वाचा: Amazon-Flipkart पेक्षा स्वस्तात प्रोडक्ट्स विकत आहे ‘हे’ सुपर अ‍ॅप, खरेदीवर रिवॉर्ड्सही; पाहा डिटेल्स

वाचा: मस्तच! Airtel ने लाँच केला स्वस्तात मस्त प्लान, ग्राहकांना एकाच रिचार्जमध्ये मिळणार डेटा-कॉलिंग-DTH सेवा

वाचा: सरकार लवकरच जारी करणार ‘ई-पासपोर्ट’, महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी होणार निर्मिती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *