तुमच्या नकळत शेजारी तुमचे Wi-Fi वापरत असतील तर लगेच बदला ‘या’ सेटिंग्स, कनेक्शन राहील सुरक्षित


नवी दिल्ली: गेल्या काही काळात Wi-Fi ची मागणी वाढली असून आजकाल प्रत्येकाच्या घरी वाय-फाय कनेक्शन असते. पण, हॅकर्स वायफायचा गैरवापर करत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. हेच कारण आहे की, जेव्हाही तुम्ही नवीन वायफाय इन्स्टॉल कराल तेव्हा लगेच काही गोष्टींमध्ये बदल करा. हे बदल तुम्ही जुन्या वायफायमध्येही करू शकता. वायफाय कनेक्शन सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वप्रथम प्रथम तुम्ही वायफाय आणि अॅडमिन पासवर्ड बदला. राउटर तुमच्या घरी इन्स्टॉल झाल्यानंतर सर्वप्रथम याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पासवर्ड सेट करताना लक्षात ठेवा की नवीन पासवर्ड साधा नसून थोडा कठीण असावा.

वाचा: Realme GT 2 पहिल्या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा डिस्काउंट, फोनमध्ये ५० MP कॅमेरा-६५ W चार्जिंग

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे एकदा वायफाय इन्स्टॉल झाल्यावर तुम्ही लगेच नाव देखील बदलले पाहिजे. नवीन राउटरचे नाव सामान्य
असते. जे सर्वांना माहित असते. म्हणूनच तुमच्या वायफाय रेंजमध्ये येणाऱ्या लोकांना कळू नये म्हणून तुम्ही असे नाव ठेवणे टाळावे. तुम्ही रिमोट ऍक्‍सेस देखील डिसेबल ठेवले पाहिजे. असे बरेच राउटर आहेत जे हार्ड ड्राइव्हला जोडण्याची परवानगी देतात आणि हे आपल्या इंटरनेटवर हल्ला करण्याचा एक मार्ग देखील असू शकतो. तुम्ही सेटिंग्ज मेनूवर जाऊन ते सहजपणे Disable करू शकता. तसेच, ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अपडेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे.

अपडेट्स नवीन फीचर्ससह आणि फिक्ससह येतात. हेच कारण आहे की, तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अपडेट ठेवली पाहिजे किंवा तुम्ही तिचा ऑटोमॅटिक अपडेट ऑप्शन देखील चालू ठेवू शकता. जेव्हा WiFi यापुढे आवश्यक नसेल, तेव्हा तुम्ही ते बंद केले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही झोपायला जाता किंवा कुठेतरी बाहेर जाता, तेव्हा तुमचा राउटर बंद करायला विसरू नका. Wi-Fi बंद केल्याने, ते हॅकर्सच्या संपर्कात येणार नाही आणि कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट होणार नाही.

वाचा: स्टायलिश लुक आणि शानदार कॅमेरासह दोन स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत OnePlus, पाहा डिटेल्स

वाचा: एकच नंबर ! टी-शर्टमध्येही फिट होतो ‘हा’ छोटासा AC, कडक उन्हात संपूर्ण दिवस देतो बेस्ट कुलिंग, पाहा डिटेल्स

वाचा: भन्नाट ! आता ‘या’ स्मार्ट बॉटल्स सांगणार कधी आणि किती पाणी प्यायचे, पाहा फीचर्स आणि किंमत

Source link

Leave a Reply