Headlines

तुमचा फोन देखील होतो गरम? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास मिनिटात होईल ‘सुपर कूल’

[ad_1]

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनच्या एका क्लिकवर अनेक कामे शक्य झाली आहेत. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसभर वापर होत असल्याने फोन गरम होत असल्याची तक्रार अनेक यूजर्स करतात. अनेकदा फोनचा स्फोट झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. उन्हाळ्यात ही समस्या अधिकच जाणवते. मात्र, तुम्ही सहज ही समस्या दूर करू शकता. तुमचा फोन देखील काही मिनिटातच जास्त गरम होत असल्यास, तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. मात्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस थोडे गरम होणे हे सामान्य मानले जाते. मात्र, फोन जास्त गरम होत असल्यास काहीतरी समस्या असण्याची शक्यता आहे.

ब्राइटनेस करा कमी

फोनच्या टेम्प्रेचरला कमी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला स्क्रीन ब्राइटनेसला ऑप्टिमाइज करावे लागेल. सध्या बाजारात येणारे स्मार्टफोन्स जास्त ब्राइटनेस सपोर्टसह येतात. त्यामुळे गरज नसल्यास ब्राइटनेस कमी ठेवा. कारण यामुळे फोन लवकर गरम होतो व बॅटरी देखील समाप्त होते.

अनावश्यक अ‍ॅप्सला करा अनइंस्टॉल

तुमच्या फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स असल्यास तुमचा हँडसेट गरम होण्याची शक्यता आहे. कारण हे अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये काम करत असतात व प्रोसेसरचा देखील वापर होतो. त्यामुळे फोनच्या बॅकग्राउंड अ‍ॅप्सला क्लिन करत राहा. तसेच, अनावश्यक अ‍ॅप्सला फोनमधून डिलीट करा.

गेमिंग कमी करा

गेमिंगसाठी फोनचा वापर वाढला आहे. अनेकजण मिड रेंज आणि लो बजेट स्मार्टफोन्समध्ये हेवी गेम खेळतात. यामुळे फोन गरम होतो. यापासून वाचण्यासाठी तासंतास हेवी गेम खेळणे टाळावे. तसेच, सूर्यप्रकाश पडणार नाही, अशा ठिकाणी देखील फोन वापरणे टाळा.

चार्जिंग करताना घ्या काळजी

फोनला चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने देखील गरम होतो. तुमचा फोन देखील चार्जिंग करताना गरम होत असल्यास, तुम्हाला हाय-क्वालिटी चार्जर वापरण्याची गरज आहे. तसेच, फोन लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट नसल्यास, त्वरित अपडेट करा. दरम्यान, फोन जास्त गरम होत असल्यास बॅटरी खराब झाली असण्याची देखील शक्यता आहे. तुम्ही सर्विस सेंटरमध्ये देखील फोनला दाखवू शकता.

वाचा: भन्नाट ट्रिक! विना केबल कनेक्शन मोफत पाहू शकता लाईव्ह टीव्ही, ‘हे’ अ‍ॅप येईल खूपच उपयोगी

वाचा: दररोज २GB डेटासह ‘या’ रिचार्जमध्ये कॉल्स आणि Disney+ Hotstar फ्री, अतिरिक्त बेनिफिट्सही जबरदस्त; पाहा डिटेल्स

वाचा: घरबसल्या स्मार्टफोनवरून मिनिटात लिंक करा Aadhaar-PAN, उद्या शेवटचा दिवस; जाणून घ्या प्रोसेस

वाचा: ३१ मार्चनंतर ‘या’ स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, तुमच्या फोनचा तर समावेश नाही? पाहा संपूर्ण लिस्ट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *