Headlines

तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो की नाही ? असे करा माहित, पाहा स्टेप्स

[ad_1]

नवी दिल्ली: 5G India: इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवाही सुरू केली. सोबतच पंतप्रधानांनी 5G च्या गुणवत्तेबद्दल देखील सांगितले. पण, जर तुम्हाला आजपासून तुमच्या फोनमध्ये 5G वापरायचा असेल, आणि यासाठी नक्की काय करावे कळत नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही काही ट्रिक्स सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल आणि तेथून त्यांच्या फोनला 5G सेवेचा लाभ मिळेल की नाही हे ते स्वतः तपासावे लागेल.

वाचा:इन्व्हर्टरची नाही गरज, लाईट गेल्यानंतरही प्रकाश देतात ‘हे’ Rechargeable LED Bulb, किंमत ३५० रुपयांपेक्षा कमी

मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन आहेत, जे 5G कनेक्टिव्हिटीसह येतात आणि ज्यांची किंमत १३ हजार रुपयांपासून ते १.५० लाख रुपयांपर्यंत आहे. 5G कनेक्टिव्हिटी माहित करून घ्यायची असेल तर यासाठी यूजर्सला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर नेटवर्क आणि इंटरनेटमध्ये , मोबाइल नेटवर्क अंतर्गत दिलेल्या Preferred Network typeवर क्लिक करा. यानंतर, एक संपूर्ण यादी समोर येईल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भिन्न स्मार्टफोनमध्ये भिन्न पर्याय असू शकतात. या यादीमध्ये 5G असल्यास,तुमचा देखील 5G ला सपोर्ट करेल. बँडमध्येही फरक असेल, ज्याची यादी कंपनी लवकरच जाहीर करेल.

वाचा: कोणतेही App डाउनलोड करताना राहा सावध, ‘या’ ४ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, नुकसान होणार नाही

4G पेक्षा 5G किती वेगवान आहे ? 5G चा वेग 4G पेक्षा १०० पट जास्त आहे. 5G मधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचा वेग.

5G नंतर 4G चे काय होईल? 5G आल्यानंतरही 4G स्मार्टफोन चालत राहतील आणि लोकांना 4G इंटरनेटची सुविधा मिळत राहील. ते 4G डिव्हाइसेस देखील 5G प्रमाणे काम करत राहतील. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनौ आणि पुणे या शहरांमध्ये प्रथम 5G उपलब्ध होणार आहे.

वाचा: Flipkart-Amazon Sale संपल्यानंतरही iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याची पुन्हा एक संधी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *