तुम हुस्न परी तुम जाने जहाँ…. ; बिकीनीत दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण


मुंबई : ‘बीच आणि बिकीनी….’ हे शब्द तुमच्या कानांवर तेव्हा येतात जेव्हा एखाद्या समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळाला भेट देतो. पण, सध्या तसंही काहीच करण्याची गरज नाही. म्हणजेच अशा कोणत्याही पर्यटनस्थळी जाण्याची गरज नाही. कारण, समुद्रकिनारी एका नारळाच्या कलत्या झाडावर बसून सनबाथ घेणाऱ्या या अभिनेत्रीला पाहूनच समुद्रकिनाऱ्यावर असल्याची जाणीव आपल्याला होत आहे. 

मिनी स्कर्ट आणि बिकीनीमध्ये दिसणारी ही सौंदर्यवती, एका लोकप्रिय बॉलिवूड कलाराची बहिण आहे. ती अद्यापही कोणत्याच चित्रपटातून झळकलेली नाही. पण, तरीसुद्धा तिच्या व्यक्तीमत्त्वाची चर्चा आतापासूनच सुरु आहे. 

फिटनेस फ्रिक भाऊ असल्यामुळं तिसुद्धा याच मार्गावर आली आहे. तिची फॅट टू फिट जर्नी असो किंवा मग एखादा बोल्ड लूक असो. चर्चा व्हायची ती होतेच. ही सौंदर्यवती कोण, असा प्रश्न विचारला असता तुमच्या डोक्यात कोणाचं नाव येतंय? 

भाऊ फिटनेस फ्रिक अभिनेता, तितकाच उत्तम डान्सर, वडिल मनमिळाऊ अभिनेते असं एकंदर कुटुंब असणारी ही बिकीनी ब्युटी आहे, कृष्णा श्रॉफ. 

In my natural habitat असं कॅप्शन लिहित कृष्णानं तिचा बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिचं सौंदर्य पाहताना भल्याभल्या अभिनेत्रींचाही विसर पडत आहे. (Tiger Shroff Sister krishna shroff)

समुद्रकिनारी, आपल्या अदांनी सर्वांनाच घायाळ करण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा अनेकदा तिनं असे बरेच फोटो पोस्ट केले आहेत. हा फोटो मात्र त्या सर्वांमध्ये वरचढ ठरतोय हेच खरं. Source link

Leave a Reply