Headlines

‘तू मुस्लिम…’, Govinda च्या पाया पडल्यामुळे ‘हा’ Pakistani Actor ट्रोलर्सच्या निशाण्यावर

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गोविंदाचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. नुकतंच दुबईमध्ये एक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानमधील अनेक चित्रपट कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफानं (Fahad Mustafa) तो गोविंदाचा चाहता असल्याचे सांगत त्याने चक्क गोविंदाच्या पायाला स्पर्श करत त्याचा आशीर्वाद घेतला. फहाद मुस्तफाने गोविंदाचा पाय पडल्यानं पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : कोट्यावधींची संपत्ती असूनही Anushka- Virat राहणार भाडेतत्वावर? देणार इतक्या लाखांचं भाडं

दुबईमध्ये मिडल ईस्ट अचिव्हर्स अवॉर्ड्स सोहळा दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या अवॉर्ड सोहळ्यात फहादला पुरस्कार देण्यात आला. यावेळी फहादनं स्टेवर असताना गोविंदाचं खूप कौतुक केलं आणि त्याचं अभिनय क्षेत्रात येण्याचं कारण गोविंदा असल्याचे त्यानं म्हटलं आहे. गोविंदामुळे फहादला प्रेरणा मिळाली. फहाद स्टेवरून उतरल्यानंतर सरळ गोविंदाकडे गेला आणि त्याचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर फहादनं गोविंदाला मिठी मारली. 

गोविंदा विषयी काय म्हणाला फहाद

स्टेजवर असताना गोविंदाचं कौतूक करत काय म्हणाला फहाद, ‘गोविंदा सरांमुळे मी पहिल्यांदा अभिनय करायला सुरुवात केली. सर, मी तुमचा मोठा चाहता आहे आणि मला पाकिस्तानात वाटायचे की, मला जो काही अभिनय करायचा आहे, तो तुमच्यासारखाच करायचा आहे. मग रणवीर आला, मग…’ (Ranveer Singh)

फहाद पुढे म्हणाला, ‘मी तुमचा मोठा चाहता आहे आणि तुमचं चाहता राहिल. तुम्ही ज्या रंगमंचावर उभे राहता त्या मंचावर आज आम्ही उभे आहोत हे भाग्यच आहे. पुन्हा एकदा गोविंदा सरांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. मला आशा आहे की पाकिस्तान आणि भारत पुन्हा एकत्र येतील आणि चांगले काम करतील.

गोविंदाच्या पाया पडल्यामुळे फहाद झाला ट्रोल (Fahad Mustafa Got Trolled) 

पाकिस्तानी लोकांना फहादचं गोविंदाचा पाया पडणं आवडलं नाही. त्यानंतर नेटकऱ्यांनी फहादला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. फहादला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, ‘पाकिस्तानी असून पाया का पडलास. फहाद मुस्तफा तू मुस्लिम आहेस.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘त्याच्या पाया पडून, जेवढा Attitude होता तो सगळा तू घालवलास.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हे काय केलसं तू फहाद, गोविंदाच्या पाया का पडलास.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘कोणाला आदर देऊन काही फरक पडत नाही, तुमची विचारधारा महत्त्वाची आहे.’ 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *