Headlines

सत्यानास! बॉलिवूड अभिनेत्रीसोबत डिनर डेटवर जाताच Boyfriend नं मागवला बेडूक

[ad_1]

मुंबई : सहसा एखादा मुलगा आणि मुलगी ज्यावेळी एखाद्या डेटवर जातात तेव्हा त्यांच्यात बऱ्याच गप्पा होतात. एकमेकांना ओळखण्याची संधी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या खाण्याच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कळतात. (Bollywood Actress )

डिनर डेटवर गेल्यानंतर सहसा कमी खाणं किंवा आपल्याला ज्या गोष्टी ठाऊक आहेत अशीच ऑर्डर केली जाते. समोरच्या व्यक्तीसमोर उगाचच हशा नको, हाच यामागचा हेतू असतो. 

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीसोबत मात्र वेगळीच घटना घडली. पॅरिसमध्ये ती तिच्या (तेव्हाच्या) प्रियकराला भेटण्यासाठी म्हणून गेली आणि मग ही मंडळी डेटवर गेली. 

तसं म्हणायला गेलं तर हा तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील अतिशय वाईट आणि विचित्र प्रसंग होता. कारण जे घडलं ते तिलाही अनपेक्षित होतं. 

ही अभिनेत्री आहे कंगना राणौत. ती एकदा पॅरिसला असताना प्रियकरासोबत डेटवर गेली. तिथे त्यांनी खाण्यासाठी काही पदार्थ ऑर्डर केले. कंगनाच्या परदेशी प्रियकरानं तेव्हा तिथे चक्क बेडकाचा एक पदार्थ मागवला. (Bollywood Actress Kanganas Ex Boyfriend Once Ordered Frog On A Date In Paris)

Kangana Ranaut called 'gadhi' for taking the pastry near her mouth and  putting it back; netizens say, 'Covid fela rahi hai'

ऑर्डर आली आणि कंगना पाहते तो काय, त्याच्या समोर असणाऱ्या प्लेटमध्ये बटरमध्ये परतलेला बेडूक निपचीत पडला होता. तो बेडकाचा पदार्थ फ्रेंच डेलिकसी असल्याचंही त्यानं सांगितलं आणि पचकन तो पदार्थ चवीनं खाल्ला. कंगनासाठी हे सर्वकाही नाही म्हटलं तरी किळसवाणंच होतं. 

एका मुलाखतीदरम्यान कंगनानं याचा खुलासा केला. तू त्याच्याशी डेटवर बेडूक खाल्ला म्हणून तर ब्रेकअप नाही केलंस? असा प्रश्न विचारला असता कंगनानं त्याचं नकारार्थी उत्तर दिलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *