सच्चा प्यार नही है…. लग्नानंतर कतरिनाचा Video Viral; खरं बोलतेय का ती?


मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ सध्या विकी कौशल याच्यासोबत वैवाहित आयुष्यात रुळताना दिसत आहे. कामाचा व्याप सांभाळतच कतरिना विकीला आणि त्याच्या कुटुंहालाही पुरेसा वेळ देताना दिसत आहे. तिचं हे जबाबदार वागणं चाहत्यांच्याही मनाचा ठाव घेऊन जात आहे. (Katrina kaif Vicky kaushal)

विकी आणि कतरिनाचा चाहत्यांनाही विशेष हेवा. एकमेकांवर प्रेम असतानाही अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी हे नातं गुलदस्त्यात ठेवलं. काहींना तर यांच्या लग्नाची बातमी कळताच धक्काही बसला होता.

असो…. प्रेमाच्या बळावर आपलं नातं उभं असल्याचं सांगणाऱ्या या जोडीच्या नात्यात सर्वकाही आलबेल तर आहे ना?

कतरिनाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून असाच प्रश्न पडत आहे. कारण, इथं ती काहीतरी भलतच बोलताना दिसत आहे. ‘मी सांगितलं ना, खरं प्रेम वगैरे काही नाही… सर्व पैशांसाठी आहे’, असं कतरिना या व्हिडीओमध्ये म्हणतेय.

ऐकून धक्का बसतोय ना? पण, इथेच तर मोठं गौडबंगाल आहे. कारण हा व्हिडीओ आताचा नसून, काही दिवसांपूर्वीचा आहे. जेव्हा कतरिना सलमानसोबत एका रिऍलिटी शोमध्ये गेली होती.

प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली असता या जोडीनं कार्यक्रमात जी धमाल केली होती, त्याचीच झलक हा व्हिडीओ दाखवत आहे. कतरिनाचा हा डायलॉग तिथं असणाऱ्या अनेकांनाच खळखळून हसवून गेला. 

थोडक्यात कतरिना आणि विकीच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही सुरेखरित्या सुरु आहे इतकंच. Source link

Leave a Reply