Trends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा ‘हा’ खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!


Year in Search 2022: सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या सर्च इंजिने म्हणजेच गुगलने 2022 या (Google Trending in 2022) वर्षी गुगलवर सर्वांत सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप 10 सर्च झालेल्या व्यक्तींची नावं समोर आली आहे. यामध्ये नुपूर शर्मापासून (Nupur Sharma) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं देखील नाव आहे. मात्र, सध्या चर्चा सुरू आहे एका खेळाडूची… ना विराट ना रोहित…

यंदाच्या वर्षात गुगलवर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) माजी खेळाडू प्रविण तांबे (Pravin Tambe) सर्वाधिक सर्च झाला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी प्रवीण तांबे आयपीएलमध्ये (IPL) खेळायला आला आणि त्यानंतर तो जगप्रसिद्ध झाला. त्याच्या संघर्षाची कहाणी फार वेगळी. त्याच्या संघर्षपुर्ण आयुष्यावर  ‘कौन प्रवीण तांबे’ हा सिनेमा (Kaun Pravin Tambe?) प्रदर्शित झाला होता. या सिनेमा मोठं यश देखील मिळालं. मराठी सिनेकलाकार श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) प्रविण तांबेची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता प्रविण तांबे खूप चर्चेत आला.

प्रविण तांबेचं करियर –

प्रवीण तांबेने 2013 च्या (Pravin Tambe IPL Career) मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) वयाच्या 41 व्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पदार्पण केल्यानंतर अस्पष्टतेतून प्रसिद्धी मिळवली. लीगमध्ये समावेश होण्यापूर्वी तांबे प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) देखील खेळला नव्हता.

आयपीएलमध्ये (IPL) शानदार पदार्पण केल्यानंतर, तांबे 2013 त्या हंगामाच्या उत्तरार्धात चॅम्पियन्स लीग T20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याने या स्पर्धेत 6.5 च्या सरासरीने 12 विकेट घेतले होते. त्‍या वर्षीच्‍या कामगिरीमुळे 2013-14 रणजी करंडकात मुंबई संघासाठी त्‍याला पहिल्‍यांदा बोलावण्‍यात आलं.

आणखी वाचा – IND vs BAN: “रोहित खेळणारच होता तर…”, पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले!

दरम्यान, 2014 च्या आयपीएल हंगामात, तांबेने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Pravin Tambe) शानदार हॅट्ट्रिक केली, ती त्या मोसमातील पहिली आणि एकूण 12 वी हॅट्ट्रिक (hatrick) होती. टी-ट्वेंटी स्तरावर प्रविण तांबेची कामगिरी अफलातून राहिली. मात्र, टीम इंडियामध्ये (Team India) त्याला कधी संधी मिळाली नाही. मात्र, त्याची प्रेरणादायी कहाणी (Pravin Tambe Inspirational story) अनेकांना भावल्याचं पहायला मिळालं.Source link

Leave a Reply