Headlines

Travel Tips: प्रवासादरम्यान Periods आलेत, मळमळ होतेय? चिंता करण्यापेक्षा आधी ही बातमी वाचा

[ad_1]

मुंबई : घड्याळ्याच्या काट्यावर चालणारं आयुष्य त्यात सततचा वाढतच जाणारा कामाचा व्याप हे सर्व पाहता, कधी एकदा मोठ्या सुट्टीवर जातो याचीच उत्सुकता प्रत्येकाला लागलेली असते. (Travel Tips lifestyle carry these medicine)

फिरण्यासाठी जायचं म्हटलं की, आपण बरीच तयारी करतो. तयारीचे निकष हे प्रत्येक व्यक्तीनुसार आणि ते कोणत्या ठिकाणी फिरायला जातात त्यावर अवलंबून असतात. पण काही गोष्टी मात्र सर्वांसाठीच सारख्या असतात. 

सारख्या असणाऱ्या या गोष्टींपैकी एक म्हणजे, प्रवासादरम्यान होणारा शारीरिक त्रास. लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघालं असता सततची डोकेदुखी, मळमळ, डोळे जड होणं, अती प्रवासामुळे मासिक पाळीची तारीख मागे येणं अशा बऱ्याच समस्यांचा यामध्ये समावेश आहे. 

बरं यामुळं होणारा त्रासही तितकाच कंटाळवाणा. काही घरगुती उपायांचा आधार घेऊन मात्र या दुखण्यापासून काहीसा आराम मिळवता येऊ शकतो. 

डॉक्टरांचा सल्ला 
प्रवासाला जाण्यापूर्वी एकदातरी डॉक्टरांची भेट घ्या. तुम्हाला असणाऱ्या व्याधी आणि दरवेळी प्रवासात होणाऱ्या त्रासाची त्यांना कल्पना द्या. त्या अनुशंगाने डॉक्टर देतील तो सल्ला आणि ती औषधं सोबत बाळगा. विमान, रेल्वे किंवा रस्ते मार्गानं प्रवास करतेवेळी काही गोळ्या चॉकलेटं सोबत बाळगा. एखादं च्युइंग गम चघळत राहिल्यास प्रवासात कानाला दडा बसत नाही. 

डोकेदुखी थांबवण्यासाठीचे उपाय 
प्रवासादरम्यान तुम्हालाही डोकेदुखीचा सामना करावा लागत असल्यास अशा वेळी औषधं सोबत बाळगा. तुळशीचा किंवा आल्याचा रस सोबत ठेवा आणि घोटभर तो प्या. यामुळंही तुम्हाला आराम मिळेल. 

मळमळ कशी थांबवाल? 

प्रवासादरम्यान मळमळ होणं ही सर्वसामान्य बाब आहे. हे मोशन सिकनेसमुळे होतं. मळमळ थांबवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रवासाला निघण्यापूर्वी हल्का आहार करा. मळमळ थांबवण्यासाठी तुम्हाला सोसेल ते औषधही घ्या. शिवाय सोबत आवळा सुपारी, लिंब, मीठ किंवा लिंबाचं लोणचं बाळगा. 

पिरियड्स क्रॅम्प 
प्रवासामध्ये अनेकदा काही महिलांना अवेळी मासिक पाळीची भीती सतावत असते. त्यातही सतत फिरस्तीवर असल्यामुळं पिरियड्सदरम्यान पोट प्रचंड दुखू लागतं. अनेकदा तर तापही येतो. अशा वेळी सोबत एखादी गरम पाण्याची पिशवी बाळगणं फायद्याचं ठरू शकतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *