ट्रान्सपरंट साडीसाठी अभिनेत्रीने मोजके इतके भरमसाट पैसे; आपण म्हणू एफडी केलेली बरी…


मुंबई : टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आपला प्रत्येक लूक सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अनेकदा वेस्टर्न लूकमध्ये दिसलेल्या मौनी रॉयच्या या लूकने सगळ्यांना इम्प्रेस केलं आहे. मौनीने आता साडीत फोटो शेअर केले आहेत. महत्वाचं म्हणजे या साडीची किंमत सगळ्यांनाच धक्का देणारी आहे. मौनी रॉयच्या साडीची किंमत ऐकून कुणाला वाटेल एखादी 

मौनी रॉय या फोटोत अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या नजरा सगळ्यांना घायाळ करणाऱ्या आहे. मौनी रॉयने नेसलेली ही साडी अतिशय महागडी आहे. सध्या सगळीकडे या साडीचीच चर्चा आहे. 

साडीत दिसला मौनीचा घायाळ करणारा लूक 

मौनी रॉयने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये मौनी रॉय ट्रान्सपरंट साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. 

या साडीत मौनी रॉयने अतिशय किलर पोझ दिली आहे. मौनीचा साडीतील हा लूक अतिशय सुंदर आहे. सोबतच मॅचिंग ब्लाऊज देखील घातला आहे. 

मौनी रॉयच्या फक्त साडीचीच नाही तर तिच्या ज्वेलरीची देखील जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीने तिच्या लुकची विशेष काळजी घेतली आहे. तिने कमीतकमी मेकअप केला आहे . त्यामुळे मौनी रॉय अगदी सहज आणि सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने ऍक्सेसरीजसाठी, आपल्या हाताच्या बोटात खूप अंगठ्या आणि कानात सुंदर कानातले घातले आहेत. 

साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

मौनी रॉयच्या साडीची किंमत खूप जास्त आहे. कुणाच्या हौसेला मोलं नसतं जे म्हणतात ते खरंच आहे. साडीची किंमत ऐकून तुम्हाला वाटेल एवढा मोठा खर्च करणं खरंच गरजेचं होतं.

रिपोर्टनुसार, मौनी रॉयच्या या साडीची किंमत सुमारे ८४ हजार रुपये आहे. मौनी रॉयची ही साडी प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मौनी रॉयच्या साडीची किंमत ऐकून कुणाला वाटेल. आपण ऐवढ्या पैशाची एखादी एफडी काढू अथवा महिला विचार करतील एवढ्या किंमतीची एक साडी घेण्यापेक्षा मी दोन वर्षांत एवढ्या हजारांच्या साड्या घेईन. 

मौनी रॉयने नुकतेच गोव्यात बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केले आहे. ती अनेकदा पती सूरजसोबत तिचे फोटो शेअर करत असते.Source link

Leave a Reply