Headlines

traffic jam return journey of Ganesha devotee in mangaon to lonere alibaug

[ad_1]

गौरी गणपतीचा सण साजराकरून गणेशभक्त मंगळवारी परतीच्या प्रवासाला लागले. मात्र माणगाव ते लोणेरे दरम्यान त्यांना वाहतुक कोंडीच्या विघ्नाला सामोरे जावे लागले. गौरीगणपतींचे सोमवारी उत्साहात विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला गणेशभक्तांनी भक्तीभावाने निरोप दिला. यानंतर मंगळवारी गणेशभक्त परतीच्या मार्गाला लागले. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणारी वाहनांची संख्या सकाळपासून वाढली होती. दुपारच्या सुमारास त्यात आणखिन भर पडली.

यामुळे रायगड जिल्ह्यातील लोणेरे ते माणगाव दरम्यान वाहतुक कोंडी निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. या पट्ट्यात वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर रांगा लागल्या होत्या. अरुंद रस्ता आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुक कोंडीत आणखिनच भर पडत होती. त्यामुळे १५ ते २० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासंतास लागत होते.माणगाव अपवाद वगळता इतर कुठेही वाहतुक कोंडी झाली नव्हती. कोलाड, इंदापूर, वाकण, वडखळ येथे वाहतुक सुरळीत सुरु होती. माणगाव येथे महामार्ग रुंदीकरणाचे काम रखडले आहे.

हेही वाचा : “बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे…”; भाजपाच्या ‘मिशन बारामती’बद्दल विचारलं असता फडणवीसांचं सूचक विधान

शहराच्या मध्यवर्ती भागातून महामार्ग जात असल्याने रस्ता अरुंद आहे. त्यामुळे येथे सातत्याने वाहतुक कोंडी निर्माण होत असते. ही बाब लक्षात घेऊन माणगाव येथे बाह्य वळण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण हे काम रखडल्याने कोकणवासीयांना सातत्याने वाहतुक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *