घटस्फोटानंतर आजही मलायकाला सतावते अरबाजची आठवण, लग्नाआधी घडली होती ‘ही’ घटना…घटस्फोटानंतर आजही मलायकाला सतावते अरबाजची आठवण, लग्नाआधी घडली होती ‘ही’ घटना…


Malaika Aroara Purposed Arbaaz Khan : अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांची लव्हस्टोरी आजही त्यांच्या चाहत्यांना आवडते. त्यांचा घटस्फोट झालेला असला तरी त्यांच्या चाहत्यांना त्यांना एकत्र पाहायला आवडेल. मलायका आणि अरबाज यांनी 19 वर्षांची संसार केला त्यात त्या दोघांना दोन मुलंही झाली. इतकी वर्ष सुखी संसार केल्यानंतर मात्र त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही फार दुःख झाले. आता अरबाज जॉर्जियाला डेट करत असून मलायका अर्जून कपूरला डेट करते आहे. 

लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही जर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असला तरी ते आजही आपल्या मुलांसाठी एकत्र भेटतात. अरबाज खान आणि मलायका अरोरा या दोघांनी लग्नाची 19 वर्षे एकत्र घालवली असली तरी त्याआधी दोघेही अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. म्हणजेच दोघांनी जवळपास 25 वर्षे एकत्र घालवली. तरीपण हे नाते तोडणे मलायका आणि अरबाज दोघांसाठी सोपे नव्हते. पण कधी कधी आयुष्यात असे एक वळण येते की प्रेमाशी जोडलेले नाते त्याच आकांठेतून द्वेष आणि रागात तोडावे लागते. दोघांनीही आपल्या नात्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी जे व्हायचे तेच झाले. 

असा झाला प्रेमारंभ….
एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. ज्या जाहिरातीत दोघांनी एकत्र काम केले होते. मलायकाच्या सौंदर्यावर अरबाज फिदा झाला होता तर मलायकाही अरबाजच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा झाली होती. दोघेही एकमेकांच्या अखंड प्रेमात होते. एकत्र काम करता करता ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्यात जवळीकही वाढली आणि शेवटी दोघांनी डेट करायला सुरुवात केली. दोघांचे अफेअर 5 वर्षे चालले. अरबाजला चांगले ओळखल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर मलायकाने त्याच्यासोबतच आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने स्वतःहून पुढाकार घेत अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले.

त्याचवेळी अरबाज मलाइकाच्या लग्नाचा प्रस्ताव ऐकताच त्याने तिला हो सांगायला अजिबात उशीर केला नाही. त्यावेळी अरबाज एवढेच म्हणाला की, ”तुम्ही तारीख आणि ठिकाण ठरवा आणि मी लग्नाला पोहोचतो.” अखेर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला. डिसेंबर 1998 मध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार हा विवाह झाला होता.Source link

Leave a Reply