TMKOC : ‘प्रॉब्लेम तो है..’, शो सोडलेल्या कलाकारांची चाहत्यांना भासतेय उणीव


मुंबई :  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) या छोट्या पडद्यावरील मालिकेने गेल्या 14 वर्षांपासून रसिक प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलंय. मात्र काही वर्षभरात अनेक कलाकारांनी ही लोकप्रिय मालिका सोडली. तर काही कलाकारांचं निधन झालं. नुकतंच ‘तारक मेहता’ (Taarak Mehta) हे पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनीही मालिकेला रामराम ठोकला.  सातत्याने कलाकार मालिका सोडत असल्याने चाहत्यांनीही मालिकेकडे पाठ फिरवलीय. असं असलं तरी चाहत्यांना या मालिकेतील जुन्या कलाकरांची आठवण येतेय. शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर (Social Media) मालिकेतील आधीच्या कलाकारच चांगले होते, त्यांच्याशिवाय मालिका बघायला मजा येत नाही, अशी खंत व्यक्त केलीय. (tmkoc taarak mehta ka ooltah chashmah serial audience are deficiency and emotional for actors who quit show)

या मालिकेतील आघाडीच्या कलाकारांनी वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे ही मालिका सोडली. तर काही कलारांनी हे जगच सोडलं.

तारक मेहता हे पात्र साकरणाऱ्या शैलेश लोढा, दयाची भूमिका करणारी दिशा वकानी, टप्पूच्या भूमिकेत असलेला भाव्या गांधी आणि राज अनादकट,  अंजली मेहताची भूमिका बजवणारी नेहा मेहता, सोनूची भुमिका करणारी निधी भानूशाली आणि रोशन सिंह सोढीची भूमिका करणारा गुरुचरण सिंह या कलाकरांनी आतापर्यंत ही मालिका सोडलीय. डॉक्टर हाथीची भुमिका करणारे कवी कुमार आझाद आणि नट्टू काका साकारणारे घनश्याम नायक या दोन्ही कलाकारांचं निधन झालंय. 

अपवाद वगळता वरील ही सर्व कलाकार मंडळी या शोच्या सुरुवातीपासून होती. या कलाकारांनी मालिकेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षरकांच्या मनावर मोहिणी घातली होती. मात्र एकामागोमाग एक कलाकार मालिका सोडून जात आहेत. प्रेक्षकांना त्यामुळे आधीच्या तुलनेत आता ही मालिका पाहण्यात फारशी मजा येत नाही. 

“जुने एपिसोड चांगले आहेत. आताचे एपिसोड्स बघण्यात रस नाही. आताचे सर्व एपिसोड्स हे कंटाळवाणे आहेत. मी नेहमी जुने एपिसोड पाहतो”, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिलीय. तर “जुन ते सोनं, दयाची भुमिका करणाऱ्या दिशा वकानीने मालिका सोडल्यापासून मी हा शो पहायचं सोडलंय”, असंही एका चाहत्याने म्हटलंय.Source link

Leave a Reply