Headlines

‘तिच्याकडे सर्व काही होतं, पण…’, कोणाला पाहून Neena Gupta गुप्ता यांचा जळफळाट?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडमध्ये  अनेकांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावे लागतात. महत्त्वाचं म्हणजे काहींना कमी कालावधीत यश मिळतं, तर काहींना मात्र अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. अशाचं अभिनेत्री पैकी एक म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta)… करियरच्या सुरुवातील नीना यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, कठीण कळात त्यांना प्रेमाची साथ देखील मिळाली नाही.  पण म्हणतात ना देव प्रत्येकाची परीक्षा घेत असतो.. असचं काही नीना यांच्यासोबत झालं आहे. 

नुकताचं झालेल्या एक मुलाखतीत, नीना यांनी अनेक गोष्टींचा मनमोकळेपणाने खुलासा केला. यावेळी नीना यांनी एका मोठ्या गोष्टीचा स्वीकार केला. त्या म्हणाल्या, ‘मला अभिनेत्री शबाना आझमी यांना पाहून जळफळाट व्हायची…’

‘अनेक अभिनेत्रींना मुख्य भूमिका ऑफर केल्या जायच्या. एवढंच नाही, तर अनेक प्रोजेक्टमध्ये त्या नीना गुप्ता यांची जागा घ्यायच्या… फार पूर्वी शाबाना आझमी यांना पाहून मला जळफळाट व्हायची… कारण त्यांना अधिक चांगल्या भूमिका मिळायच्या…’

पुढे त्या म्हणाल्या, ‘मला भूमिकेबद्दल सांगण्यात यायचं पण नंतर मला न सांगता भूमिकेतून बाहेर काढलं जायचं… पण आता सर्व काही उत्तम आहे. मला चांगल्या भूमिका मिळत आहेत…’

‘आता माझी स्पर्धा माझ्यासोबत आहे. आता मी शांत आहे… आनंदी देखील आहे…’  दरम्यान,  एक सिंगल मदर होणं काय असतं आणि त्यांनी आपल्या मुलीला त्यातून कसं वाढवलं याबद्दल सांगतलं आहे. 

एवढंच काय तर या ऑटोबायोग्राफीमुळे नीना गुप्ता यांच्या खासगी जीवनातील अतिशय नाजुक गोष्टी देखील सर्वांसोमर आल्या. या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे ‘सच कहूं तो’. आता नीना गुप्ता या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, त्या त्यांच्या बायोपिकमुळे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *