‘त्याने भर रस्त्यात मला…’, शबाना आझमींच्या भाचीसोबत प्रवासात घडला धक्कादायक प्रकार


मुंबई : तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारी खाजगी कॅब कधी कधी तुमच्या त्रासाचं कारण बनते. खाजगी कॅबशी संबंधित अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत.

ज्यामुळे सोशल मीडियावर याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. आता या खासगी टॅक्सी सेवेबाबत अशी घटना समोर आली आहे. हा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या भाचीसोबत घडला आहे.

शबाना आझमी यांच्या भाचीचे नाव मेघना विश्वकर्मा आहे. मेघनासोबतची ही घटना शबाना आझमी यांच्या पोस्टवरून उघड झाली आहे. शबानाने तिच्या ट्विटरवर या घटनेचा उल्लेख केला आहे. ज्यासोबत अभिनेत्रीने भाचीच्या फेसबुक पोस्टची लिंक देखील शेअर केली आहे.

अभिनेत्रीने ट्विटमध्ये म्हटलंय, ‘माझ्या 21 वर्षीय भाचीसोबत खाजगी कॅबमधून प्रवास करताना एक घटना घडली आहे. आणि हे स्वीकारण्या जोग नाही.’ मेघना विश्वकर्मा यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले- ‘माझी कॅब राईड ही लोअर परेलपासून ते अंधेरीपर्यंत होती. ड्रायव्हरने माझी राईड स्वीकारली आणि मी गाडीत बसले.

काही मिनिटांच्या राईडनंतर वाटेत खूप ट्रॅफिक असल्याचं डाईव्हरच्या लक्षात आलं. त्यामुळे तो घरी उशिरा पोहोचेल म्हणून त्याने पुढे जाण्यास नकार दिला, आणि मला दादर ब्रिजच्या मध्यभागी उतरवलं. ही संपूर्ण घटना रात्री उशिरा घडली.त्यावेळी मला दुसरी कॅब मिळणे अवघड होते.”

मेघना विश्वकर्माने पुढे लिहिले- ‘मी ब्रीचवरून उतरले आणि दादर मार्केटमार्गे पायी गेले. मला पुढे पोहोचायला 2 तास लागले.’ वाहनचालकांची इतर माहितीही तिनं ट्विट करत शेअर केली आहे.

तिचासोबत घडलेला हा प्रकार शबाना आझमी यांना जेव्हा कळाला तेव्हा त्यांनी ही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्या कंपनीला याबाबत योग्य ते पाऊल उचलण्याचं आवाहन केलं आहे.Source link

Leave a Reply