Headlines

गरज असते तेव्हाचं आऊट होतात, माजी क्रिकेटपटूची सीनियर खेळाडूंवर सणसणीत टीका

[ad_1]

मुंबई : आयपीएल संपल्यानंतर आता सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेकडे खिळल्या आहेत. या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.याचं सीनियर खेळाडूंच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.   

आयपीएलमधील कामगिरी आणि इतर सामन्यातील परफॉर्मन्स पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खास कामगिरी करता आली नाही. दोघांच्या बॅटीतून धावा निघत नसल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे दोघे सध्या टीकेची धनी ठरतायत. त्यात आता भारताचा दिग्गद क्रिकेटपटू माजी कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाच्या टॉप-3 खेळाडूंच्या फॉर्मवर मोठा प्रश्न उपस्थित केलाय.

कपिल देव म्हणतात की, टीम इंडियाच्या या टॉप तीन खेळाडूंची विश्वासार्हता पणाला लागली आहे, तिघेही दबावाखाली आहेत.  पण ही चिंतेची बाब नाही. तुम्हाला न घाबरता क्रिकेट खेळावे लागेल. हे तीन खेळाडू असे आहेत जे 150-160 च्या स्ट्राइक रेटने धावा करू शकतात, असे ते म्हणालेत. 

पुढे ते म्हणतात की, जेव्हा जेव्हा धावा करण्याची गरज असते तेव्हा तो बाद होतो. जेव्हा जेव्हा डावाला गती द्यावी लागते तेव्हा तो बाद होतो. त्यामुळे संघावर दबाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.  

केएल राहुलबाबत काय म्हणाले?

कपिल देव यांनी केएल राहुलवरही प्रतिक्रिया दिली आहे. केएल राहुलच्या भूमिकेबाबत स्पष्ट होणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जर संघाने त्यांना सांगितले की तुम्हाला 20 ओव्हर्स खेळायची आहेत आणि तुम्ही 60 धावा करून नाबाद आलात, तर तुम्ही योग्य करत नाही आहात. तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल, जर असे झाले नाही तर तुम्हाला स्वतः खेळाडू बदलावे लागतील, असे ते म्हणालेत.  

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत कॅप्टन रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे. तर कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली युवा टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने खेळणार आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *