अफजलखान व सय्यद बंडाच्या कबर परिसरात आणखी तीन कबरी आढळल्या; महसूल प्रशासनाकडून तपास सुरूप्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यालगत अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने पाडले आहे. येथे अफजलखान व सय्यद बंडाच्या कबर परिसरात आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत.याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. यातील एक कबर सेवेकऱ्याची किंवा सरदाराची असण्याची तर दुसऱ्या तिसऱ्या कबरीचा दाखला इतिहासात नसल्याचे सांगितले जात आहे. येथील दोन कबरी अलीकडच्या काळातील असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

हेही वाचा- दिलासा! ‘हर हर महादेव’ राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

अफजलखानाच्या बरोबर लढण्यास एका सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये मारला गेला म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाची कबर असे म्हटले जाते असेही स्थानिकांनी सांगितले. दुसरी कबर अलीकडच्या काळातील ख्वाजा मिया याची आहे. तो अफजलखान कबरीच्या सेवेसाठी आला होता. त्याचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून उल्लेख केला जातो. मात्र दोन कबरी अलीकडील काळातील आहेत. या कबरीवर कोणतीही माहिती लिहिलेली नाही. अफजल खानाच्या कबरी शेजारी आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत माहिती घेण्याचं काम महसूल विभागाकडून सुरु आहे.

हेही वाचा- “गजानन किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात…”, संजय राऊतांचं टीकास्र; स्वत:चं दिलं उदाहरण!

अफजल खानाच्या कबर परिसरात वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या ठिकाणी उरूस भरविला जात होता.अफजलखानाचे दैवतीकरण सुरु झाले होते.अफजलखान फकिराच्या अंगात येत असे आणि शिवाजीने दगा दिला असे ओरडत असे. कबर परिसरही मोठ्या मशिदित रूपांतर करण्याचे प्रयत्नही सुरु झाले होते. मोठ्या प्रमाणात झालेले अनधिकृत बांधकाम तोडावे आणि अफजलखानाचे दैवतीकरण रोखवे अशी मागणी स्थानिक नागरिक,प्रतापगड उत्सव अमिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केले होते. याबाबत वाई, पाचवड, सातारा, सांगली आदी महाराष्ट्रात आंदोलन झाले होते.अफझलखान कबर परिसरात एक एकर जागेत अतिक्रमण करण्यात आले होते. ते संपूर्ण अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने पोलीस संरक्षणात पाडले आहे. यामध्ये १९ खोल्या दोन विश्रांतीगृहाचा समावेश होता. अफजलखान कबर परिसरात केलेलं अतिक्रमण गुरुवार दि १० नोव्हेंबर रोजी पूर्णपणे पाडण्यात आले. मात्र, या परिसरात सापडलेल्या कबरी कोणाच्या आहेत याबाबत महसुलकडे काय नोंद आहे ते तपासले जात आहे. जर शासनाने आदेश दिल्यास अफजलखान व सय्यद बंडाच्या कबरीं व्यतिरिक्त असणाऱ्या इतर कबरीही प्रशासन हटविण्याची शक्यता आहे.

Source link

Leave a Reply