Headlines

This is not the laughing fair of Maharashtra you are the minister of the state Supriya Sules criticism of Chandrakant Patal rno news msr 87



राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यपकांच्या वेतनाबाबत केलेल्या विधानावरून टीका केली आहे. शिवाय ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात. असंही सुप्रिया सुळे यांनी सांगलीत एका कार्यक्रमातील भाषणात म्हटलं. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती.

सुप्रिया सुळे म्हणाल्या “एक मंत्री जेंव्हा बोलतो तेंव्हा त्याला हलक्यात घ्यायचे नाही. अशी गंमतजमंत करायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही भाषण करताना विचार करूनच बोला. इतका मोठा मंत्री जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांनी त्याबाबत निधी तयार ठेवला असेल. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची?, शक्य अशक्य या गोष्टी मंत्र्यांनी बघायच्या आहेत, कारण वक्तव्य त्यांनी केले आहे.”

हेही वाचा : राज्यात मध्यवधी निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं पत्रकारपरिषदेत विधान, म्हणाल्या…

याचबरोबर “जर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असेल की सर्व खासगी कॉलेजच्या शिक्षकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही निधी तयार ठेवला आहे का? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का ? उठ सुठ महाराष्ट्रातील मंत्री बेजजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे.” असंही यावेळी सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलं.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते? –

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाबाबत विधान केलं होतं. “शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकांची कमतरता आहे. पण तरीही धकवले जात आहे. प्राध्यापकांची कमतरता कमी व्हावी म्हणून २ हजार ७२ प्राध्यापकांची भरती करत आहोत. महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क आकारून त्यातून प्राध्यापकांचे पगार होत असेल. तर तुम्ही फी कमी करा, तुमच्या प्राध्यापकांचे पगार आम्ही करतो.”



Source link

Leave a Reply