Headlines

मला फारसं टेन्शन नाहीये…; खराब फॉर्मबाबत Rohit Sharma चं धक्कादायक विधान!

[ad_1]

Rohit Sharma : भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सीरिज सुरु आहे. यातील दुसरा सामना शनिवारी रायपूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने (team india beat new zealand) मोठा विजय मिळवला. न्यूझीलंडच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांनी चांगलीच दाणादाण उडवून दिली. अवघ्या 108 रन्समध्ये न्यूझीलंडची संपूर्ण टीम पव्हेलियनमध्ये परतली होती. 

दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांना कॅप्टन इनिंग (Captain innings) पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्याने त्याच्यावर टीका केली जातेय. अशातच शनिवारच्या सामन्यानंतर शतक न मारल्यामुळे रोहितच्या फॉर्मवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर कर्णधाराने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. 

रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, तो ज्या पद्धतीने खेळतोय, त्याने मी खूश आहे. रोहित शर्माने गेल्या 3 वर्षापासून वनडेमध्ये एकंही शतक ठोकलेलं नाही. जानेवारी 2020 मध्ये त्याच्या अखेरच्या शतकाची नोंद आहे. 

दुसऱ्या वनडे सामन्यानंतर त्याच्या शतकासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला. यावेळी उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, मी माझा खेळ बदलण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीपासूनच मी बॉलर्सवर दबाब टाकतोय. विरोधी टीमवर दबाव टाकणं खूप गरजेचं आहे. मला माहितीये, मी मोठी खेळी करू शकत नाहीये, मात्र त्यामुळे मी फारसा टेन्शनमध्ये नाहीये.

मी माझ्या फलंदाजीने संतुष्ट आहे. माझं अप्रोच चांगलं असून, मी ज्या पद्धतीने कामगिरी करतो, ती मला आवडतेय. मला माहितीये की, मी मोठ्या खेळीच्या अगदी जवळच आहे, असंही कर्णधाराने म्हटलंय.

रोहित शर्माची कॅप्टन इनिंग

शनिवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने 50 बॉल्समध्ये रन्सची खेळी केली. यामध्ये कर्णधाराने 7 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश आहे. तर शुभमन गिलने 53 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली देखील मैदानात उतरला होता. मात्र अवघ्या 11 रन्सवर त्याला माघारी परतावं लागलं.

याच वर्षामध्ये भारताला टीम इंडियामध्ये वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. अशामध्ये टीम इंडियाच्या चाहत्यांची आशा आहे की, रोहित शर्माने फॉर्ममध्ये यावं. रोहितला वनडे क्रिकेटचं लेंजड मानलं जातं, तो वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार रन्सच्या जवळ आहे.

टीम इंडियाने जिंकली सीरिज

न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा वनडे टीम इंडियाने 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यासह भारताने सीरिज देखील खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. कर्णधाराने ओपनिंगला उतरत अर्धशतक झळकावलं आणि टीमला विजय मिळवून दिला. अवघ्या 21 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे लक्ष्य गाठलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *