इंजेक्शन, गोळ्या द्या…काहीही करा…; तिसरी T20 खेळण्यासाठी Suryakumar Yadav ची अशी सुरु होती धडपड


हैदराबाद : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) रोमहर्षक पद्धतीने जिंकलाय. 6 विकेट राखून टीम इंडियाने हा विजय मिळवलाय. या विजयानंतर टीम इंडियाने 9 वर्षानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध (austrailia) टी20 मालिका जिंकली. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो Suryakumar Yadav.

ओपनर केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहलीच्या सोबतीने सुर्यकुमारने डाव सांभाळला. टीम इंडियाच्या हातातून मॅच जाणार अशी स्थिती असताना स्कायने 69 रन्सची तुफान खेळी करत भारताकडे सामना खेचून आणला. सूर्यकुमारच्या सिक्स आणि फोरच्या आतीषबाजीने भारताने तिसऱ्या सामन्यासह सिरीजही काबीज केली. मात्र अगदी या सामन्यापूर्वी सुर्यकुमार यादव प्रचंड आजारी असल्याचं समोर आलंय.

सूर्यकुमारने सांगितली पडद्यामागची गोष्ट

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी मध्यरात्री 3 वाजता सूर्यकुमार यादव आजारी पडला होता. त्याला पोटदुखी आणि ताप आला होता. कालच्या सामन्यानंतर अक्षर पटेल सोबत झालेल्या छोट्या मुलाखतीत खुद्द सूर्यकुमारने याबाबत खुलासा केला आहे.

अक्षरसोबत बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, “अचानक वातावरणामध्ये बदल झाला तसंच प्रवास झाल्यामुळे मला पोटदुखीचा त्रास झाला. शिवाय यासोबत ताप देखील आला होता. मात्र हा निर्णायक सामना होता, त्यामुळे मी माझे डॉक्टर आणि फिजियोंना सांगितलं की, ही जर वर्ल्डकपची फायनल असेल तर मी काय करणार. मी आजारी पडून चालणार नाही.”

अशा परिस्थितीत मी माझ्या डॉक्टरांना सांगितलं की, काहीपण करा, मला गोळ्या द्या किंवा इंजेक्शन टोचा, मात्र संध्याकाळच्या सामन्यासाठी मला रेडी करा. त्यानंतर एकदा मैदानावर आलं आणि देशाची जर्सी घातली की एक वेगळंच इमोशन येतं, असंही त्याने स्पष्टीकरण दिलं.

9 वर्षांनंतर मालिकेवर बाजी

टीम इंडियाने (Team India) शेवटची टी20 मालिका 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियासमोर आज पुन्हा मायदेशात मालिका विजयाचा योग जुळुन आला होता. त्यानुसार टीम इंडियाने (Team India) 2-1 ने मालिका खिशात घातली. आणि 9 वर्षांचा दुष्काळ संपवला. Source link

Leave a Reply