का म्हटलं जातंय बॉलिवूडच्या ‘या’ जोडप्यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा अधिकार?


मुंबई : आज व्हॅलेंटाईन डे… म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस… आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज नसते असं म्हणतात… ते खरं देखील आहे… पण प्रत्येक दिवसाचं एक खास महत्त्व असतं आणि तो दिवस आपण त्या खास व्यक्तीच्या नावी करतो. फक्त पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी यांच्यातचं नाही तर प्रत्येक नात्यात प्रमे आणि विश्वासाची गरज असते. 

नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर कोणत्याचं नात्याला तडा जात नाही. आजच्या चढा-ओढीच्या काळात या गोष्टी माणसाच्या आयुष्यत पुसट होवू लागल्या आहेत. पण बॉलिवूडमधील असे काही कपल आहेत, त्यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा खरा अधिकार असल्याचं म्हटलं जात… जाणून घेवू त्या कपल्सबद्दल…

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी म्हणून आज त्यांची ओळख आहे. आज बिग बी त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. 
 
अजय देवगण आणि  काजोल
अजय आणि काजोल यांच्या नात्यामधील कधी समोर आले नाहीत. त्यांनी प्रेम केलं, लग्न केलं आणि ते निभावलं. काजोल आणि अजयला एक मुलगा आणि मुलगी आहे. 

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख
बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. (Riteish Genelia love story) त्यांचे बॉडिंगही चांगले आहे. अनेकवेळा दोघेही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असतात.

शाहरूख खान आणि गौरी खान 
शाहरुख खानची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी स्टोरी पेक्षा कमी नाही. शाहरुख आणि गौरी शाळेच्या दिवसांपासूनच एकमेकांवर प्रेम करतात. बर्‍याच वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनीही आपल्या प्रेमापोटी आपल्या घरच्यांना सांगितलं होतं.

मात्र, शाहरुख मुसलमान असल्यामुळे गौरीच्या कुटुंबीयांनी आधी या लग्नाला नकार दिला, मात्र नंतर अखेर कुटुंबीय त्यांच्या प्रेमापुढे हार मानली.Source link

Leave a Reply