Headlines

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रवास संपाकडे

बार्शी/प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने झाडबुके महाविद्यालयाचे मा.

प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक दहा वीस तीस लाभांची आश्वासित प्रगती योजना व इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

राज्य भरात 13 व 14 डिसेंबर 2021 रोजी सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जाणार होते परंतु पोलिस परवानगी नसल्याने त्याला काळ्या फिती लावून निवेदन देण्याचे आंदोलन विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.


शासनाने मागण्या मंजूर न केल्यास राज्यभरातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी 18 डिसेंबर 2021 शनिवारपासून बेमुदत संपावरती जातील. शिक्षकेतरांना संप करण्यास शासन जबाबदार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी संघटनेचे सचिव कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद, उपाध्यक्ष उमेश मदने, सुधीर सेेवकर, अशोक पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *