Headlines

जॉबची खदखद आणि अपेक्षांची झाडा-झडती

बरचसं मित्र मंडळ सध्या जॉब च्या शोधात आहे. सर तुमच्या ओळखीने मला जॉब पहा म्हणणारे कॉल येतात. परंतु अपेक्षा प्रत्येकाची एकच असते मला शोभेल असा जॉब पहा. म्हणजे नेमका कसा? तर मी हलके कामं करू शकत नाही आणि हा विचार समाजासाठी घातक आहे.हा भांडवली, ब्राम्हणवादी (ब्राम्हण आणि ब्राम्हणवाद यात फरक आहे, ब्राम्हणशाही ही एक मानसिकता आहे, स्वतः ला श्रेष्ठ समजणारी, मग ती कुठल्याही जतितील व्यक्तीमध्ये असू शकते.) विचार आहे.

आज बीड सारख्या शहरात कुठल्याही कंपन्या नाहीत. रोजगार म्हटले तर 2-4 शोरुम, हॉस्पिटल, कपड्याची दुकाने, हॉटेल्स, याच्यापलीकड काही आठवत नाही. मग वाटतं यांना रवींद्र जगतापांच्या खुर्चीवर बसवावं का? भिंगत्या खुर्चीवर? एसी केबिनमध्ये? मला एक वाटत काम हे काम असतं. त्यात हलकं भारी असं काही नसतं. माणसाला कष्ट करण्याची लाज असू नये. हे पूर्ण विश्व मेहनत करणाऱ्या लोकांमुळे उभा आहे. त्यामुळे त्याला हिन, तुच्छ समजने चुकीचे आहे. माणसानं आपल्या टॅलेंटप्रमाणे जॉब निवडला पाहिजे हे खरं आहे परंतु जॉब मिळत नसेल तर काहीही करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

उदा. माझ्याकडे 50 किलो ओझे आहे आणि मला ते घेऊन 5 किमी अंतर जायचे आहे. सोबत एक व्यक्ती आहे. तो अर्धे ओझे घेऊ शकतो परंतु 5 किमी सोबत येत असेल तरच मी त्याला सोबत घेईल हे चूक आहे,तो येईल तिथपर्यंत सोबत घ्या, त्यापुढे दुसरा व्यक्ती पहा. जॉब चे पण तसेच आहे. मिळेल ते काम करा, नंतर दुसरा चांगला जॉब मिळल्यावर पहिला सोडून द्यावा.

मागे एकदा मी एक पोस्ट लिहिली होती, पाटील, राजे, शेठ लोकांवर.यांच्या उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवल्यावर घरात शर्ट लटकवायला खीळा सापडत नाही. पोटात अन्न नसेल तरी चालेल परंतु इस्रोचे कपडे घालून चहाच्या टपरीवर बसलेले असतात. त्यांना त्यांच्यातला शेठ काम करू देत नाहीत. ते लोक एका आभासी दुनियेत जगत असतात.मला वाटतं हे लोक वास्तव का स्वीकारत नसतील, आणि जेव्हा माणसाचं पोट आणि खिसा भुकेला असतो तेव्हा माणूस जास्त विचार करतो, नकारात्मक विचार. यातून डिप्रेशन, नैराश्य आणि सेवटी व्यसन.

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या शिक्षणव्यवस्थेत आहेत.निव्वळ गुलाम, कारकून बणवणारे शिक्षण माथी मारल जात आहे जेने करून नेते लोकांच्या हो ला हो मिसळणारे, त्यांच्या मागे पुढे करणारे कार्यकर्ते तयार होतील.स्वतंत्र विचार करणारे लोक त्यांना अडचणीचे आहेत.म्हणूनच कला शाखांचे महत्त्व कमी करून शिक्षण व्यावसायाभिमूख करण्यावर भर दिला गेला.शिक्षण आणि प्रशिक्षण या शब्दात गफलत केली.हे करत असताना देशात लागणारे कौशल्य विकसित मनुष्यबळ आणि कौशल्यप्राप्त तरुण यांच्या मध्ये फार मोठी तफावत असल्याने देशात बेरोजगार तरूणांची फौज आज देशात जन्माला आली आहे.आणि हे सर्व नियोजित आहे.कारण काम कमी आणि कामगार जास्त असतील तर मनुष्यबळ स्वस्त मिळते आणि हे भांडवलदारांना फायद्याचे ठरते.

देशाची ओळख जगातील सर्वात जास्त तरुणांचा,आणि पदवीधारकांचा सांगताना हे पण सांगितले पाहिजे की हे सर्व पदविधारक बेरोजगार आहेत,आणि ही आपबिती एका दिवसात निर्माण झाली असंही नाही.हे विषारी रोपटे काँग्रेस च्या काळात लावलं गेलं त्याची फळ आपण चाखत आहोत. आणि आता तर संघ प्रणित, समरसता अभिप्रेत असलेले मनु च्या विचाराचं सरकार 2014 पासून सत्तेत आहे त्यांचे काम आपण जाणून आहात.सध्या देश एका निर्णायक वळणावर उभा आहे, भविष्य अंधारमय आहे… तरुणांमध्ये असंतोष खदखदत आहे,3 आत्महत्या मागे 2 आत्महत्या तरुणाच्या आहेत. जो तरुण आज स्वतच्या गळ्याला फास लावताना घाबरत नाही तेव्हा तो सरकारला ताळ्यावर आणायला वेळ लागणार नाही मात्र आता झोपलेल्या वाघाने जागे होणे गरजेच आहे… तूर्तास एवढेच…
– दत्ता भोसले , बीड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *