अभिनेत्रींचे Bold Scene दिसले, पण चित्रपटांचा संदेश मात्र प्रेक्षकांपासून आजही दूर; ही कसली मानसिकता?


Bollywood movies : हिंदी चित्रपट (hindi movies) जगतामध्ये आजवर विविध मुद्द्यांना हाताळणारे चित्रपट साकारण्यात आले. प्रत्येक चित्रपटानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काळानुरुप ज्याप्रमाणं कथानक आणि कथा हाताळण्याची पद्धत बदलू लागली त्याचप्रमाणं प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि हीच कथानकं सादर करण्यासाठीची तंत्रही बदलू लागली. हळुहळू बोल्ड, इंटिमेट दृश्यांना (Intimate scene) स्वीकृती मिळाली आणि कधी हा घटक चित्रपटांच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग होऊन गेली याचा थांगपत्ताही लागला नाही. यात प्रेक्षकांच्या मानसिकतेनं महत्त्वाची भूमिका बजावली. 

बऱ्याचदा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटांमधूनही दाखवण्यात आलेली बोल्ड दृश्य इतकी गाजली, की त्या चित्रपटांचा मूळ मुद्दाच दुर्लक्षित राहिला. अर्थात काही चित्रपट हे त्यामध्ये असणाऱ्या बोल्ड दृश्यांसाठीच गाजलेली ही बाब नाकारता येऊ शकत नाही. 

यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘पार्च्ड’ (Parched). Amazon Prime Video या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणाऱ्या चित्रपटामध्ये अभिनेत्रींनीच तो पूर्णत्वास नेला. राधिका आपटे (radhika apte), सुवरीन चावला (Suvreen chawla), सयानी गुप्ता, तनिषा चॅटर्जी यांनी चित्रपटाच्या कथानकाला न्याय दिला. 

वैवाहिक नात्यात बळजबरीनं ठेवेले शारीरिक संबंध (Maratial rape), बालविवाह (Child Marriage), महिलांवर होणारे अत्याचार (rape), पूर्वापार चालत आलेल्या काही प्रथा आणि इतरही काही सामाजिक रुढींवर चित्रपटातून भाष्य करण्यात आलं होतं. पण, त्यातही चर्चा झाली ती मात्र चित्रपटातील बोल्ड सीन्सची (Bold scenes). राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांच्यातील इंटिमेट दृश्याची. 

 

कथानकाकडे दुर्लक्ष झालेला असाच आणखी एक चित्रपट म्हणजे, BA Pass. शिल्पा शुक्ला, शादाब कमल आणि सहकलाकारांच्या उल्लेखनीय भूमिका असणाऱ्या या चित्रपटात बोल्ड दृश्यांचा भरणा होता ही बाब नाकारता येत नाही. 

बीएच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेण्यासाठी धडपडणारा तरुण, अनाथ आश्रमात पाठवलेल्या दोन सख्ख्या बहिणी यांच्यासाठी तगमगणाऱ्या तरुणाला केंद्रस्थानी ठेवत चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे. इथं तो कशाचीही कल्पना नसताना gigolo (Male prostitute) होण्याच्या मार्गावर तो कसा जातो आणि याच चक्रव्यूहात अडकून त्याच्या जीवनाचा शेवट कसा होतो हे चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलांवर होणारे अत्याचार आणि समाजाचा एक भयाण चेहरा या चित्रपटामुळं समोर आला होता. Source link

Leave a Reply